सध्या उन्हाळ्यातल्या मे महिना सुरु आहे. या महिन्यात तुम्हाला अनेक प्रकारचे रानमेवे खायला मिळत असतील. पण सगळीच फळं किंवा रानमेवे तुमच्या आरोग्यासाठी चांगलीच असतील असं नाही. त्यात जर तुम्हाला कोणत्याही आजाराची लागण असेल तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. पुढील बातमीत डॉक्टरांनी दिलेली एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही जर फळं प्रेमी असाल तर तुम्हाला जांभळं खायला प्रचंड आवडत असेल. हे फळ पौष्टिक असतं. गोड-तुरट अशी त्याची चव असते. जांभळावर मीठ टाकून खाल्लं तर त्याची चव आणखी वाढते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे, फायटोकेमिकल्स आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. याने पचन सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि उन्हाळ्याच्या दिवसात हायड्रेटेड राहता येतं. पण हे फळ प्रत्येकासाठी तितकंच सुरक्षित असेलच असं नाही.
मधुमेह असलेल्या व्यक्तींना जांभूळ खायला आवडत असेल तर थांबा. जांभळामध्ये असणारे जांबोलिन आणि जांबोसिन हे घटक रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पण जे लोक आधीपासून मधुमेहासाठी औषधं घेतात, त्यांनी जांभळाचे जास्त सेवन करणे टाळले पाहिजे. कारण औषधांसोबत जांभूळ खाल्ल्याने रक्तातमधली साखर कमी होण्याची शक्यता असते. यामुळे चक्कर येणे, घाम येणे, गोंधळल्यासारखं वाटू शकतं किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांनीही जांभूळ खाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. जांभळामध्ये ऑक्सलेट्स असतात. हे घटक शरीरात कॅल्शियमसोबत एकत्र येऊन किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढवतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी कमी प्रमाणात जांभूळ खाणं आणि पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.