Maa Guhya Kali secret form of Kali saam tv
लाईफस्टाईल

Maa Guhya Kali: स्मशानात वास करणारी कोण आहे मां गुह्य काली? देवीच्या या गुप्त रूपाबाबत तुम्हाला माहितीये का?

Maa Guhya Kali secret form of Kali: इतर अनेक काली स्वरूपांप्रमाणे, गुह्य कालीचा निवासही स्मशानभूमीच्या मध्यभागी असतो. तांत्रिक ग्रंथांनुसार त्या आठ महत्त्वाच्या स्मशानभूमीच्या मध्यभागी वास करतात.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मात गुह्य काली ही परमशक्तीचं एक गुप्त रूप मानण्यात येतं. ज्याबद्दल फार कमी बोललं जातं. मां कालीच्या या रूपाची पूजा अत्यंत गुप्तपणे केली जाते. त्या स्मशानाच्या मध्यभागी निवास करतात आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या तसेच विघ्नांचा नाश करणाऱ्या आहेत. त्यांचे आह्वान मध्यरात्रीच्या पूजेत फक्त तेच लोक करू शकतात, ज्यांच्याकडे विविध तांत्रिक शक्ती असतात.

तांत्रिक परंपरेत देवी कालीचे असंख्य रूप वर्णन केलं गेलंय. त्यात महाकाली, दक्षिणा काली, स्मशान काली, भद्रकाली आणि कामकाली हे प्रमुख आहेत. महाकाली संहिता मध्ये गुह्य कालीच्या पूजेला, साधनेला आणि त्यांच्या उग्र रूपाला एक संपूर्ण विभाग समर्पित आहे.

मां गुह्य कालीचे भयानक निवास

मां गुह्य काली आठ स्मशानांमध्ये निवास करतात. त्यात महाघोरा, कालदंड, ज्वालाकुल, चंडपाश, कापालिक, धूमाकुल, भीमांगरा आणि भूतनाथ यांचा समावेश आहे. याठिकाणी त्या भैरव, डाकिनी, वेताळ, चामुंडा, सियार, त्रिशूल यांनी वेढलेल्या असतात.

गुह्य कालीचे यंत्र

मां गुह्य कालीची पूजा 18 यंत्रांच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येक यंत्र त्यांच्याशी संबंधित असते. पहिल्या यंत्रात एक बिंदू, त्रिकोण, षट्कोण, पंचकोण, वर्तुळ, 16 पाकळ्या, 8 पाकळ्या आणि त्रिशूलांसह 4 खोपड्यांची सजावट असते. हे प्रत्येक यंत्र त्यांच्या 18 मंत्रांपैकी एका मंत्राशी जोडलेले असते.

मां गुह्य कालीचे 10 मुख

  • द्वीपिका (चित्ता)

  • केशरी (शेरणी)

  • फेरू (सियार)

  • वानर (माकड)

  • रिक्सा (भालू)

  • नारी (स्त्री)

  • गरुड (बाज)

  • मकर (मगरमच्छ)

  • गजा (हत्ती)

  • हया (घोडा)

प्रत्येक चेहरा निसर्गातील वेगवेगळ्या शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. मां गुह्य कालीला 27 डोळे आणि 54 भुजा आहेत. प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. त्यात त्रिशूल, कपालदंड, डमरू, धनुष्य, चक्र, अंकुश, गदा, ढाल, हल, भाला, घंटा, हातोडा, माळा, कंकाल इत्यादींचा समावेश आहे.

मां गुह्य कालीचे स्थान

मां गुह्य काली शिवाच्या भयानक रूपांवर, पंचमहाभूतांवर विराजमान आहेत आणि भैरव त्यांचे सहावे पीठ आहेत. त्यांच्या कमलासनाखाली प्रत्येक दिशेला दिक्पाल रक्षण करतात. त्या धर्म, ज्ञान आणि वैराग्याचे प्रतीक आहेत

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रवी राणा यांच्या भेटीला

Team India: T20 वर्ल्ड कपपासून ते न्यूझीलंडची टूर...; 2026 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल टाइट, पाहा कधी आणि कोणासोबत खेळणार?

Post Office Scheme: पोस्टाची खास योजना! फक्त व्याजातून कमवा ५० लाख; कॅल्क्युलेशन वाचा

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने फेटाळली VVIP ची तिसरी बायको होण्याची ऑफर, अब्जाधीश दरमहा देणार होता 11 लाख

Kolambi Fry Recipe: कोळंबी कुरकुरीत फ्राय कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT