Monkeypox saam tv
लाईफस्टाईल

Monkeypox: मंकी पॉक्सचा धोका कोणाला, कसे आहेत यावर उपचार? पाहा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

Explainer: कोरोनानंतर जगभरात आता मंकीपॉक्सने थैमान घातलंय. भारतात आता मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून अनेकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत.

Surabhi Jagdish

कोरोनानंतर जगभरात सध्या मंकीपॉक्स आजाराने थैमान घातलं घातल्याचं दिसून येतंय. अशातच भारतात मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. देशात या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडालीये. दरम्यान या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं सरकारचं म्हणणं असून आरोग्य मंत्रालयाने कॉन्टेक्ट ट्रेसिंग सुरु केलं आहे.

नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलकडून देखील यासंदर्भात लक्ष ठेवून आहे. WHO ने 14 ऑगस्ट रोजी मंकीपॉक्सला ग्लोबल हेल्थ इमरजेंसी म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर आता भारतात देखील याचा रूग्ण सापडल्याने नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं

मंकी पॉक्स काय आहे आणि तो कुठून आला?

मंकी पॉक्स एक व्हायरल डिसीज असून तो एमपॉक्स नावाच्या व्हायरसमुळे पसरतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, मंकी पॉक्स वायरस, स्मॉल पॉक्सच्या फॅमिली किंवा त्याच ग्रुपमधील व्हायरस आहे. मंकी पॉक्स पहिल्यांदा १९७० मध्ये आफ्रिकेच्या कांगो या भागातून समोर आला होता.

मंकी पॉक्सचे किती स्ट्रेन आहेत?

मंकी पॉक्सचे प्रामुख्याने दोन स्ट्रेन आहेत. यामधील पहिला स्ट्रेन ‘क्लेड-1’ आहे. हा स्ट्रेन मध्य आफ्रिकी देशांमध्ये दिसला होता. हा सर्वात घातक स्ट्रेन असून याचा संसर्ग होणाऱ्या तब्बल १० टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर दुसरा स्ट्रेन क्लेड-2 असून हा काहीसा कमी हानिकारक आहे. हाच स्ट्रेन अधिकतर देशांमध्ये पसरला आहे. या स्ट्रेनची लागण होणार्‍या 99.99% टक्के लोकं ठीक होत असल्याचं समोर आलं आहे.

काय आहेत मंकी पॉक्सची लक्षणं?

मंकी पॉक्सची प्राथमिक लक्षण हे ताप असतं. त्यानंतर डोकेदुखी, मसल पेन, थंडी भरून येणं तसंच थकवा येणं अशी लक्षणं दिसून येतात. त्यानंतर शरीरावर मोठे फोड येतात आणि ते सूजतात.

कसा पसरतो मंकी पॉक्स?

मंकी पॉक्स एक जूनोटीक संसर्ग असून तो जनावरांपासून माणसांमध्ये पसरण्याची शक्यता असते. शिवाय तो माणसांमधून जनावरांमध्ये पसरू शकतो.

मंकी पॉक्सचा धोका कोणाला?

जर एखाद्या व्यक्तीला मंकी पॉक्सचा संसर्ग झाला असेल त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना या व्हायरसची लागण होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरस त्वचा आणि श्वसनमार्गातून पसरू शकतो. नाक आणि तोंडातून शरीरात प्रवेश करतो.

काय आहेत मंकी पॉक्सवर उपचार?

मंकीपॉक्स लस बाजारात उपलब्ध आहे. 2022 मध्ये, जेव्हा हा व्हायरस युरोप आणि अमेरिकेसह अशा देशांमध्ये पसरला होता त्यावेळी लसीकरणाद्वारे त्याचं नियंत्रण करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

डॉक्युमेंटरीचा वाद सुरू असतानाच Dhanush अन् Nayanthara यांची एकाच सोहळ्याला हजेरी, 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT