White Hair Problem Saam Tv
लाईफस्टाईल

White Hair Problem: अकाली पिकणाऱ्या केसांमुळे त्रस्त? मेहंदी लावल्याने कोरडे होतात? स्वयंपाकघरातील हे पदार्थ, केस होतील काळेभोर-घनदाट

Home Remedies For White Hair : पांढऱ्या केसांना काळेभोर करण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो.

कोमल दामुद्रे

Dye For White Hair : केस पांढरे होण्याची समस्या हल्ली प्रत्येक तरुणांमध्ये दिसून येत आहे. केसगळतीची ही समस्या म्हातारपणी नाही तर वेळेआधीच सर्वांना सतावते आहे. पांढऱ्या केसांना काळेभोर करण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो.

केसांना काळे करण्यासाठी डाय, मेहंदी लावल्याने केस काळेभोर तर होतातच परंतु, त्याचा संपूर्ण केसांवर परिणाम होतो. त्यामुळे केस कोरडे होतात आणि केसात कोंडा देखील होतो. परंतु, जर केसांची काळजी घ्यायची असेल तर स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते.

1. आवळा

आवळ्यामध्ये (Amla) आरोग्यास (Health) आवश्यक असणारे खनिजे व पोषकतत्वे असतात. केसांपासून ते त्वचेसाठी आवळा फायदेशीर ठरतो. हे अँटीऑक्सिडंट आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. लिंबाच्या रसात आवळ्याचा रस घालून टाळूवर किंवा केसांवर ३० मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा.

2. कढीपत्ता

अकाली पिकणाऱ्या केसांची (Hair) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी कढीपत्ता हा फायदेशीर मानला जातो. यामध्ये मेलेनिन नावाचे तत्व असते, जे केस काळे होण्यास मदत करते. या मेलेनिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात. खोबरेल तेलात कढीपत्ता घालून हे तेल गरम करा. थंड झाल्यानंतर टाळूला लावा. केस पुन्हा काळेभोर होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: e-KYC ची मुदत 30 एप्रिलला संपली; 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

SCROLL FOR NEXT