risk of breast cancer Women saam tv
लाईफस्टाईल

Breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कोणत्या महिलांना अधिक? ४० वर्षांपुढील महिलांनी 'ही' टेस्ट करावीच, तज्ज्ञांचा सल्ला

Surabhi Jagdish

स्तनाचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. हा कॅन्सरच्या जोखीमीचे घटक जाणून घेतल्यास तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय करण्यात मदत होऊ शकते. स्तनाचा कर्करोग कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु काही घटक असे असतात जे जोखीम वाढवतात. विशेषत: तुमचं वाढते वय.

न्यूबर्ग लेबोरेट्रीचे डॉ. अजय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना जास्त धोका असतो, म्हणूनच या वयाच्या आसपास मॅमोग्राफी सारखी नियमित तपासणी करण्याची शिफारस केली जाते.

स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणाला आहे?

वय

40 पेक्षा जास्त वयाच्या महिलांना जास्त धोका असतो. 50 किंवा त्याहून जास्त वयाच्या महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर असल्याचा धोका अधिक दिसून येतो. तरीही संभाव्य धोका टाळण्यासाठी लवकर तपासणी करून घेणं महत्वाचं आहे.

कौटुंबिक इतिहास

जर आई, बहीण किंवा मुलगी सारख्या जवळच्या नातेवाईकांपैकी कुणाला स्तनाचा कर्करोग झालेला असेल तर तुम्हाला तो होण्याची शक्यता वाढते. स्तनाच्या कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास खासकरून जर तरुण वयात झाल्याचं निदान झालं असल्यास तुमच्या बाबतीत अनुवांशिक धोका जास्त आहे.

हार्मोन एक्सपोजर

हार्मोन रीप्लेसमेन्ट थेरपीचा (एचआरटी) दीर्घकालीन वापर किंवा वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिलं मूल झाल्यास स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. या गोष्टींचा विचार करता, वयाची 40 वर्षे पूर्ण झालेल्या महिलेने चाचण्या करून घेण्यास सुरूवात करणं गरजेचं आहे. मॅमोग्राम्स अर्थात छातीचा एक्स-रे ज्यामध्ये लहान असलेले ट्यूमर्स लक्षात येतात.

आनुवांशिक घटक

काही लोकांच्या बाबतीत, बीआरसीए1 आणि बीआरसीए2 सारख्या विशिष्ट जनुकांमध्ये बदलाचा वारसा मिळतो. ज्यामुळे स्तनाच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत असं काही असल्यास अनुवांशिक चाचणीचा विचार केला जाऊ शकतो.

जीवनशैली

धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव, जास्त वजन अशा जीवनशैली संबंधित घटकांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. निरोगी जीवनशैली ठेवल्यास धोका कमी होऊ शकतो.

डॉ. शाह म्हणाले, स्तनाच्या कर्करोगाची लवकर माहिती मिळाल्यास तो लहान असताना आणि पसरलेला नसताना त्याच्या वर केलेले उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे जीव वाचू शकतात. बऱ्याच महिलांना धोका जाणवत देखील नसेल परंतू कुणालाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. शिवाय त्याची लक्षणं सुरुवातीच्या स्थितीत असताना जाणवत नाहीत. तुमच्या संरक्षणासाठी नियमित तपासणी हा उत्तम पर्याय आहे.

वयाची 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कॅन्सरचं लवकर निदान व्हावं म्हणून मॅमोग्राम करून घेतल्याने उपचार करणं सोपं आणि अधिक परिणामकारक ठरतं. एकंदरीत 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया, विशेषत: ज्यांना कौटुंबिक इतिहास किंवा जीवनशैलीच्या समस्यांसारख्या जोखीम घटक आहेत, त्यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीला प्राधान्य दिले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

Ajit Pawar: राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य! काल ६०० कार्यकर्त्यांनी साथ सोडली, आज खंद्या समर्थाकाने दंड थोपाटले, अजित पवारांना इशारा!

Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!

SCROLL FOR NEXT