लाईफस्टाईल

Vitamin deficiency : कोणत्या व्हिटॅमीनच्या कमतरतेने जास्त झोप येते? वेळीच लक्ष द्या अन्यथा...!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाच्या शरीराला झोपेची गरज असतं. प्रत्येक व्यक्तीने दर दिवसाला ७-८ तासांची झोप घ्यायची असते. मात्र आपल्यापैकी काही जण असते असतात, ज्यांना जास्त प्रमाणात झोप येते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जास्त झोपेची अनेक कारणे असू शकतात. जास्त झोप आणि थकवा हे अनेकदा पौष्टिक कमतरतेशी संबंधित असतात.

तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर किंवा सतत झोप येत असेल तर हे शरीरातील काही व्हिटॅमिनच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आपल्या शरीरात काही जीवनसत्त्वं असतात ज्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. शरीरात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त झोप येते आणि त्याची कमतरता कशी दूर होऊ शकते, हे पाहूयात.

या व्हिडीटॅमीनच्या कमतरतेने येते झोप

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हाडं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. अनेक संशोधनांमध्ये असं समोर आलंय की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे झोपेशी संबंधित समस्या उद्भवतात. या व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळे व्यक्तीला जास्त झोप येण्याची शक्यता असते. शिवाय यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा देखील जाणवू शकतो.

व्हिटॅमिन बी 12 आपल्या नर्वस सिस्टमसाठी आणि लाल पेशींच्या निर्मितीसाठी खूप महत्वाचं मानलं जातं. काही संशोधनातून असं समोर आलं आहे की, त्याच्या कमतरतेमुळे जास्त थकवा आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. याशिवाय व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, अशक्तपणा, हृदयाचे ठोके वाढणं या समस्या दिसून येतात. व्हि़टॅमीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारात अंडी, मासे, मांस, बीन्स, नट आणि दूध यांचा समावेश असतो.

व्हिटॅमिन सी केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीच नाही तर शरीरातील ऊर्जेची पातळी योग्य राखण्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे. त्याच्या कमतरतेमुळे, स्नायूंवर परिणाम होतो आणि एखाद्याला खूप थकवा जाणवतो. याशिवाय याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, हिरड्यांमधून रक्त येणं, सांधेदुखी आणि त्वचा कोरडी पडणं हे देखील होण्याची शक्यता असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

Pakistan Firing : पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT