Sleeping Position : निरोगी आरोग्यासाठी खाण्यापिण्याबरोबरच चांगली झोप देखील घेणे गरजेचे आहे. परंतु, कामाचा कितीही थकवा असला तरी, चांगली झोप घेण्यासाठी अनेकांना बरेच प्रयत्न करावे लागतात.
चांगली झोप येण्यासाठी आपली दिनचर्या ही महत्त्वाची भूमिका घेते. त्यासाठी आपण कशाप्रकारे झोपतो हे देखील महत्त्वाचे आहे. चांगल्या झोपेसाठी यांची देखील काळजी (Care) घेणे अधिक आवश्यक आहे.
तज्ज्ञ काय सांगतात ?
तज्ज्ञ सांगतात की, पोट, पाठ किंवा एका कुशीवर झोपल्याने आपल्याला घोरण्याची सवय लागते व त्याचबरोबर स्लीप एपनियाची लक्षणे दिसू लागतात. तसेच पाठदुखीचा त्रास देखील सुरु होतो. यासोबतच आपण चुकीच्या स्थितीत झोपल्यास झोपेमध्ये व्यत्यय येणे, तणाव वाढणे आणि रक्ताभिसरणाच्या खराब समस्यांना (Problems) देखील तोंड द्यावे लागते.
या प्रकरणाबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे आपली प्रतिकारशक्ती आणि चयापचय क्रियांवर वाईट परिणाम होतो. मात्र, आता प्रश्न पडतो की आपण कोणत्या स्थितीत झोपावे? याबद्दल जाणून घेऊया.
१. पाठीवर झोपणे
पाठीवर झोपणे हे सर्वात सामान्य झोपण्याच्या स्थितीत येते. या स्थितीत झोपल्याने आपल्या पाठीचा कणा नैसर्गिकरित्या स्थितीत राहतो. यासोबतच आपल्याला मान, पाठ आणि खांदे दुखीसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.
२. एका कुशीवर झोपणे
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बहुतेक वृद्ध लोक एका कुशीवर झोपतात. कारण ही स्थिती सर्वात आरामदायक मानली जाते. यामुळे माणसाला आरामदायी वाटते. या स्थितीत आपल्या पाठीचा कणा सरळ राहतो.
३. या स्थितीत झोपू नका
संशोधनानुसार, पोट किंवा छातीवर झोपू नये. हे खूप धोकादायक ठरू शकते. या स्थितीत झोपल्याने आपल्या फुफ्फुसांवर आणि छातीच्या पोकळीवर खूप दबाव पडतो. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.