Parenting tips in Marathi, health care tips in marathi
Parenting tips in Marathi, health care tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Parenting Tips : वाढत्या वयानुसार मुलांना द्या असा आहार !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाढत्या वयानुसार मुलांचे (Child) खाणे-पिणे देखील बदलते. घर आणि ऑफिसमुळे (Office) पालकांना मुलांकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. आपले मुलं दिवसभरात काय खाते, किती प्रमाणात खाते, खाल्ले जाणारे पदार्थ मुलांच्या शरीराला लागतात का? त्या पदार्थामधून मुलांना आवश्यक ते पोषक घटक मिळतात का? या सगळ्या गोष्टींकडे पालकांनी (Parents) लक्ष द्यायला हवे. वाढत्या वयानुसार मुलांचे खाण्या-पिण्याचे अधिक नखरे असतात त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत बदल होताना दिसून येतात. पण त्याचा परिणाम मुलांच्या वाढीवर होऊ शकतो.

हे देखील पहा-

बाहेरच्या किंवा खराब पदार्थांचे सेवन केल्यास मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ लागतो. मुलांच्या शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे व लोह कमी झाल्यास मुलं अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडू शकतात. त्यामुळे देखील त्यांच्या उंचीवर परिणाम होतो.

मुलांची उंची वाढवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा.

१. दूध -

दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि प्रोटीन असल्यामुळे मुलांच्या वाढीत त्याचा परिणाम दिसून येतो. तसेच दूध प्यायल्याने हाडे देखील मजबूत होतात आणि मुलांची उंची वाढण्यास मदत होते. तसेच मुलांना गाईचे दूधही प्यायला दिल्यास फायदा होतो.

२. रताळू -

मुलांच्या आहारात रताळूचा समावेश करावा. रताळूमध्ये जीवनसत्त्व अ, क आणि ब -६ तसेच मॅग्नेशियम व पोटँशियम भरपूर प्रमाणात आढळून येते. याचे नियमित सेवन केल्यास मुलांची उंची वाढण्यास मदत होईल.

३. अंडी -

अंड्यात प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात आढळते. तसेच मुलांनी अंड्याचे नियमित सेवन केल्यास त्यांची उंची वाढण्यास मदत होईल.

४. पालक -

पालकात भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे पालकाचे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते तसेच मुलांची उंची देखील वाढते.

५. बीन्स -

बीन्समध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यासमुळे शरीरातील हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

मुलांच्या आहाराबरोबर त्याच्या शारीरिक गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी आपल्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

SCROLL FOR NEXT