What Is Liver Cirrhosis saam tv
लाईफस्टाईल

Liver Cirrhosis: कोणत्या आजारामुळे तुमचं यकृत सडू लागतं? शरीरात दिसतात 'हे' बदल, वेळीच लक्ष द्या

What Is Liver Cirrhosis: लिव्हर सिरोसिस झाल्यावर शरीर तुम्हाला काही खास संकेत देतं. यावेळी शरीरात काही बदल दिसून येतेत. यावेळी कोणत्या बदलांवर लक्ष ठेवावं हे आज आपण जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. यकृत म्हणजेच लिव्हरचं आरोग्य योग्य राखणं गरजेचं असतं. लिव्हर सिरोसिस हा सायलेंट किलर मानला जातो. हा आजार कोणत्याही विशिष्ट लक्षणांशिवाय वाढतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

ज्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर या समस्येला ओळखणं जवळजवळ अशक्य आहे. लिव्हर सिरोसिस झाल्यावर शरीर तुम्हाला काही खास संकेत देतं. यावेळी शरीरात काही बदल दिसून येतेत. यावेळी कोणत्या बदलांवर लक्ष ठेवावं हे आज आपण जाणून घेऊया.

ज्यावेळी यकृत खराब होत राहतं त्यावेळी लिव्हर सिरोसिस होतो. यकृत हा अवयव सेल्फ रिपेयरिंग करण्यास सक्षम असतं. परंतु वारंवार दुखापत झाल्यास नवीन पेशी तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे यकृताला आजारांनी घेरलं की ते खराब होऊ लागतं.

काय लक्षणं दिसतात?

  • भूक न लागणं

  • वजन कमी होणं

  • थकवा आणि अशक्तपणा

  • पोटदुखी

  • अस्वस्थता

  • पाय किंवा पोटात सूज येणं

  • त्वचा आणि डोळे पिवळं होणं

  • त्वचेत खाज येणं

  • लघवीचा रंग गडद होणं

लिव्हर सिरोसिस होण्याची कारणं

अल्कोहोलचं सतत सेवन यकृताच्या पेशींना थेट नुकसान करतं. हिपॅटायटीस बी विषाणूजन्य संसर्गावर वेळेवर उपचार न केल्यास सिरोसिसचा धोका वाढतो. लठ्ठपणा आणि मधुमेह असलेल्या लोकांना खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सिरोसिसचा धोका असतो. त्याचप्रमाणे ऑटोइम्यून हेपेटायटीसमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती यकृताच्या पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे सिरोसिसचा धोका वाढतो.

यावर उपचार कसे केले जातात?

सिरोसिसचा कसे उपचार व्हावेत हे त्याच्या तीव्रतेवर आणि कारणावर अवलंबून असतं. मद्यपान पूर्णपणे बंद करणं, हिपॅटायटीससाठी अँटीव्हायरस घेणं आणि निरोगी जीवनशैलीसह संतुलित आहार घेणं आवश्यक आहे हे हा आजार टाळण्यासाठी महत्त्वाचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Maharashtra Live News Update: दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय - प्रताप सरनाईक

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT