वास्तुशास्त्रानुसार घरातील स्वयंपाकघर हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. स्वयंपाकघराचा संबंध थेट अन्नाशी जोडला जातो. त्यामुळे या ठिकाणी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. स्वयंपाकघरातील वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे काही नियम आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, असं मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघराच्या ईशान्य म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला फ्रिज किंवा सिंक यांसारख्या जड वस्तू आणि पाण्याशी संबंधित गोष्टी ठेवू नयेत. असं केल्याने घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात, असं मानलं जातं.
स्वयंपाकघराची दक्षिण-पूर्व दिशा अग्नीशी संबंधित मानली जाते. त्यामुळे या दिशेला गॅस किंवा चूल ठेवणं योग्य मानलं जातं. तर उत्तर-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवणं चांगलं मानलं जातं. या गोष्टींची काळजी घेतल्यास घरातील वाद, तणाव आणि पैशांचं नुकसान कमी होऊ शकतं, असं वास्तुशास्त्र सांगतं.
स्वयंपाकघरात झाडू, साफ करण्यासाठी वापरण्यात येणारा कपडा किंवा साफसफाईसाठी लागणाऱ्या इतर वस्तू ठेवू नयेत. असं केल्याने देवी अन्नपूर्णा नाराज होते अशी धार्मिक मान्यता आहे.
काही घरांमध्ये स्वयंपाकघरात आरसा लावला जातो. मात्र वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा लावणं योग्य मानलं जात नाही. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर स्वयंपाकघरात कचरापेटी ठेवणंही टाळावं, असं सांगितलं जातं.
स्वयंपाकघरात वापरलेले किंवा घाणेरडे कपडे ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार, अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. याचा परिणाम कुटुंबातील वातावरणावर होऊ शकतो. घरात सतत तणाव राहणे किंवा आर्थिक अडचणी निर्माण होणे अशा समस्या उद्भवू शकतात, असं मानलं जातं.
याशिवाय तुटलेली किंवा चिरा गेलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. त्याचप्रमाणे खराब झालेली उपकरणंही तिथे ठेवणं टाळावं. अशा वस्तूंमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. तसंच घरातील सुख-समृद्धीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.