Cloth Vastu saam tv
लाईफस्टाईल

Cloth Vastu: धुतलेले कपडे कुठे वाळवताय? वास्तुशास्त्राचा हा नियम माहिती नसेल तर एका रात्रीतच होऊ शकता कंगाल

Clothes drying direction: वास्तुशास्त्रानुसार कपडे वाळत घालण्याची दिशा आणि वेळ महत्त्वाची मानली जाते. रात्री कपडे बाहेर ठेवणे, ईशान्य दिशेला घाणेरडे कपडे ठेवणे टाळावे, अशी मान्यता आहे. पिवळ्या आणि पांढऱ्या कपड्यांचे महत्त्वही जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

घराची सजावट, साफसफाई याकडे विशेष याकडे आपण काटकोरपणे लक्ष देतो. मात्र कपडे धुणं आणि वाळत घालणं यांसारख्या छोट्या गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. वास्तुशास्त्रानुसार, कपडे कोणत्या दिशेला आणि कोणत्या वेळी वाळत घालतो, यालाही महत्त्व आहे.

चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या वेळी कपडे वाळत घातल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते. त्याचप्रमाणे घरातील सुख-शांती आणि आर्थिक परिस्थितीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.

वास्तुशास्त्रानुसार कपडे वाळत घालण्याचे महत्त्वाचे नियम

रात्री कपडे वाळत घालणं टाळा

वास्तूशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर बाहेर कपडे वाळत घालू नयेत. रात्रीच्या वेळी कपडे बाहेर ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात येऊ शकते असं मानलं जातं. तसेच रात्री कपड्यांवर जंतू बसू शकतात. याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

योग्य दिशा निवडा

कपडे वाळत घालण्यासाठी वापरली जाणारी दोरी कोणत्या दिशेला बांधली आहे, हेही महत्त्वाचं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर आणि पूर्व दिशा जिथे एकत्र येतात त्या ईशान्य कोपऱ्यात कपडे वाळत घालण्याची दोरी बांधू नये. त्याऐवजी पश्चिमेकडून उत्तरेकडे दोरी बांधणं शुभ मानलं जातं.

कपडे उन्हात वाळत घाला

कपडे धुतल्यानंतर ते सकाळी किंवा दुपारच्या वेळी उन्हात वाळत घालणं चांगलं मानलं जातं. सूर्यप्रकाशामुळे कपड्यांमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. तसंच उन्हामुळे कपड्यांवरील जंतू नष्ट होण्यासही मदत होते.

ईशान्य कोपऱ्यात घाणेरडे कपडे ठेवू नका

घरातील ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर-पूर्व कोपरा ही देवाची जागा मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी घाणेरडे कपडे ठेवू नयेत. या कोपऱ्यात अस्वच्छता ठेवल्याने घरातील आर्थिक समृद्धीवर परिणाम होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.

कपड्यांबाबत वास्तुशास्त्रातील इतर महत्त्वाच्या टिप्स

नेहमी स्वच्छ कपडे वापरा

दररोज स्वच्छ कपडे घालण्याची सवय ठेवा. घाणेरडे किंवा फाटलेले जुने कपडे वापरणं टाळावं. वास्तुशास्त्रानुसार, अशा कपड्यांमुळे शुक्र ग्रहाचा शुभ प्रभाव कमी होतो. त्यामुळे घरात गरिबी येऊ शकते, असं मानलं जातं.

कपड्यांच्या रंगांकडेही लक्ष द्या

वास्तुशास्त्रानुसार, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं. पिवळा रंग हा गुरु म्हणजेच बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे, तर पांढरा रंग शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. हे दोन्ही रंग जीवनात शांतता आणि आर्थिक समृद्धी आणण्यास मदत करतात, अशी मान्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा न्यायालयानंतर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Railway Accident : रेल्वेचा भीषण अपघात! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले ७ डब्बे; पाहा Video

Phulwara: 'घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!'; रवी जाधव यांच्या 'फुलवरा'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Junk Food Risks : चिप्स-बर्गरची सवय मुलांच्या मेंदूला करतेय खिळखिळी, नवीन संशोधनातील धक्कादायक माहिती

EPFO WhatsApp Service : WhatsApp वर 'Hi' पाठवूनही PF माहिती मिळेना; EPFO ची नवी सेवा पहिल्याच दिवशी कोलमडली

SCROLL FOR NEXT