जगभरात भारत हा एकमेव देशात नात्यांसाठी सण साजरे केले जातात. त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वही असतं. मग भाऊ बहीणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण- भावाच्या नात्यांचा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. तर यंदा रक्षाबंधनाला ओवाळणी कधी करायची, तारीख नेमकी काय आहे याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहेत. पुढील माहितीत आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
श्रावण पौर्णिमा २७ आणि २८ ऑगस्ट अशा दोन दिवशी येतेय, त्यामुळे रक्षाबंधनाची अचूक तारीख कोणती याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. पंचांगानुसार, श्रावण पौर्णिमा तिथी गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी वाजून ९.०८ वाजता सुरू होणार आहे. शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.४८ वाजता संपेल. सनातन धर्मात उदयतिथीला खूप महत्त्व असतं. म्हणजेच ज्या दिवशी तिथी सूर्योदयाच्या वेळी असते. या नियमानुसार २८ ऑगस्ट रोजी पौर्णिमा तिथी सूर्योदयाच्या वेळी असते. त्याचमुळे रक्षाबंधन शुक्रवारी २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे केले जाईल.
२७ ऑगस्ट रोजी भद्राचा प्रभाव सकाळी ९ वाजून ८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ३२ मिनिटांपर्यंत टिकणार आहे. त्यामुळे या दिवशी राखी बांधणं योग्य ठरणार नाही. तुम्ही २८ ऑगस्ट रोजी कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्ही रक्षाबंधन साजरा करू शकता.
दरवर्षी राखी बांधण्याआधी शुभ वेळ तपासली जाते. हा दिवस शुभ असल्यामुळे याच्या मुहूर्ताला विशेष महत्व असतं. तर ज्योतिषशास्त्रानुसार, भाद्रपद महिन्यात राखी बंदी आहे, कारण ते अशुभ मानलं जातं. चांगली बातमी अशी की, २८ ऑगस्ट रोजी भाद्रपद महिना सूर्योदयाआधी संपेल. त्यामुळे दिवसभर राखी बांधणं शुभ ठरेल. विशेषत: सकाळी ५.५७ ते ९.४८ ही वेळ राखी बांधण्यासाठी योग्य असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.