Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याची नीट काळजी घेत नाही. त्यामुळे आपल्याला कमी वयात गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये कॅन्सरसारख्या जीवघेण्या समस्यांचा समावेश होतो.
कॅन्सरच्या सुरुवातीला तुम्हाला पायात अचानक वेदना, सूज, लालसरपणा किंवा जास्त गरमपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही रक्त्याच्या गाठींची लक्षणे असू शकतात.
काही रुग्णांमध्ये स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic Cancer) असल्याचं पहिलं लक्षण म्हणजे पायातल्या खोल शिरेत रक्ताची गाठ म्हणजेच DVT असू शकतो.
पायात अचानक किंवा असह्य वेदना व्हायला लागल्या असतील तर हे DVT चे संभाव्य लक्षण असून, अशावेळी डॉक्टरांकडे जावून तपासणी केली पाहिजे.
एका पायाला अचानक सूज येणे किंवा त्वचा लाल होणे हे रक्ताच्या गुठळीशी संबंधित असू शकते आणि त्याची तातडीने तपासणी करावी.
रक्ताची गाठ तयार झालेल्या भागातली त्वचा इतर भागाच्या तुलनेत गरम जाणवू शकते. वेदना आणि सूजेसोबत हे लक्षण दिसू शकते.
कावीळ, गडद लघवी, फिकट रंगाची विष्ठा, पोट किंवा पाठदुखी, थकवा, मळमळ, भूक कमी होणे आणि वजन घटणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.