Dev Diwali 2025 date and story saam tv
लाईफस्टाईल

Dev Diwali 2025 date: कधी आहे देव दिवाळी? पृथ्वीवर येऊन देवता साजरी करणार दिवाळी, वाचा कथा

Dev Diwali 2025 date and story: दिवाळीनंतर १५ दिवसांनी येणाऱ्या देव दिवाळी या सणाचे हिंदू धर्मात खूप मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी स्वर्गातील सर्व देव आणि देवता पृथ्वीवर येतात आणि दिवाळीचा उत्सव साजरा करतात.

Surabhi Jayashree Jagdish

कार्तिक पौर्णिमेला देवांची दिवाळी म्हणजेच देव दीपावली साजरी केली जाते. मान्यता अशी आहे की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवता दिवाळी साजरी करतात. या दिवशी पवित्र नद्यांच्या किनाऱ्यावर दीपदान करण्याची परंपरा आहे.

कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळीच्या दिवशी दीपदान केल्याने भगवंताचे विशेष आशीर्वाद मिळतात. यावेळी मोक्षाचे द्वार उघडतात आणि पापांचा नाश होतो. असं मानलं जातं की, या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.

कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली २०२५

पंचांगानुसार, कार्तिक पौर्णिमा तिथी ४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३६ वाजता सुरू होणार आहे आणि ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:४८ वाजता संपणार आहे. उदयातिथीनुसार, ५ नोव्हेंबर ही पौर्णिमा मानली जाणार आहे. याच दिवशी कार्तिक पौर्णिमेचे व्रत ठेवलं जाईल आणि देव दीपावली साजरी करण्यात येणार आहे. यावर्षी देव दिवाळीच्या दिवशी पूजा, आरती आणि दीपदान करण्याचा शुभ वेळ संध्याकाळी ५:१५ ते ७:५० पर्यंत आहे.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन

ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी देव दिवाळीच्या दिवशी भद्रावास योग आणि शिववास योग हे मंगलकारी योग तयार होत आहेत, जे अत्यंत शुभ मानले जातात.

काय देव दिवाळीची पौराणिक कथा?

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, एकदा त्रिपुरासुर नावाच्या राक्षसामुळे देवता, ऋषी आणि मानव सगळेच त्रस्त झाले होते. तेव्हा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरासुराचा वध करून देवतांचं रक्षण केलं. म्हणून या दिवशीला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात.

या विजयाच्या आनंदात देवतांनी काशी नगरीत येऊन दिवाळी साजरी केली होती. म्हणूनच या दिवशीला देवांची दिवाळी किंवा देव दीपावली म्हणतात. काशीच्या घाटांवर या दिवशी लाखो दीप प्रज्वलित केले जातात, जे एक अद्भुत दृश्य निर्माण करतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT