High cholesterol pain symptoms saamtv
लाईफस्टाईल

High cholesterol pain symptoms : रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरातील 'या' भागात होतात वेदना; वेळीच लक्ष देणं ठरेल फायद्याचं

Body parts pain due to high cholesterol : कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन 'एथेरोस्क्लेरोसिस' नावाची स्थिती निर्माण करते, तेव्हा शरीराच्या विविध भागांमध्ये वेदना आणि इतर लक्षणे दिसू लागतात. याकडे वेळीच लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीच्या आहार आणि अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे अनेक आजार तुमच्या मागे लागतात. यातीलच एक समस्या म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. आजकाल अनेकजण या समस्येने त्रस्त असतात. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा एक चिकट पदार्थ असतो. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. यातीलच एक म्हणजे एक म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल.

आपल्या शरीरामध्ये वाईट म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी शरीरात वाढली की ते नसांमध्ये जमा होऊ लागतं. ज्यामुळे धमन्या ब्लॉक होऊ शकतात. यामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ज्यावेळी उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते त्यावेळी शरीराच्या काही भागांमध्ये वेदना जाणवू लागतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या भागांमध्ये वेदना होतात ते पाहूयात.

पायांमध्ये वेदना

शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते. यावेळ शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यास धमन्यांमध्ये रक्त प्रवाह योग्यरित्या होत नाही. ज्यामुळे पायांमध्ये वेदना किंवा मुंग्या येण्याची समस्या जाणवते.

हातांमध्ये तीव्र वेदना

जर तुम्हाला हातांमध्ये सतत वेदना जाणवत असतील तर तातडीने डॉक्टरांची मदत घ्या. ज्यावेळी आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा हात आणि हातांमध्ये वेदना होण्याची समस्या उद्भवू शकते. जेव्हा शरीरात कोलस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं तेव्हा रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह मंदावतो, ज्यामुळे हातात वेदना होण्याची तक्रार होऊ शकते.

पाठीत वेदना जाणवणं

शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. ज्यावेळी कोलेस्टेरॉल धमन्यांमध्ये जमा होतं तेव्हा ते मणक्याच्या आजूबाजूच्या भागात रक्तप्रवाहात समस्या निर्माण करतं. ज्यामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात.

छातीत वेदना होणं

शरीरात जेव्हा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते तेव्हा छातीत वेदना होऊ लागतात. ज्यावेळी हृदयाकडे जाणाऱ्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं तेव्हा छातीत वेदना होण्याची तक्रार उद्भवते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT