WhatsApp Payment Feature Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp New Feature : आता WhatsApp नेही करता येईल पेमेंट, जाणून घ्या कसं...

Payment Feature : मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने भारतातील पेमेंट सेवेबाबत मोठी घोषणा केली आहे.

Shraddha Thik

WhatsApp New Payment Feature :

मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने भारतातील पेमेंट सेवेबाबत मोठी घोषणा केली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप पेमध्ये क्रेडिट कार्ड पेमेंटलाही सपोर्ट मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप पे हे फीचर आल्यानंतर फोनपे, गुगल पे आणि पेटीएमशी स्पर्धा करेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरचा फायदा भारतातील सुमारे 50 कोटी व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना होणार आहे.

अपडेट्स (Update) देखील फक्त UPI वर उपलब्ध असतील. नवीन अपडेटनंतर, तुम्ही WhatsApp UPI पेमेंटसाठी थेट क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यास सक्षम असाल. GooglePay, PhonePe आणि Paytm आधीच क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंटला सपोर्ट करतात.

एका रिपोर्टनुसार भारतात 30 कोटी लोक UPI हे फीचर (Feature) वापरतात. आणि दरमहा जवळपास सुमारे 180 अब्ज डॉलर्स ट्रान्सफर करतात. व्हॉट्सअ‍ॅपने भारतात JioMart सोबत खरेदी सुरू केली आहे, जरी ती अद्याप पूर्णपणे लॉन्च झालेले नाही. JioMart च्या सेवा सध्या दिल्ली, चेन्नईसारख्या मेट्रो शहरांपुरत्या मर्यादित आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने याआधीही अनेक फिचर्स लाँच (Launch) केले आहेत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर याआधी पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड वापरावा लागायचा परंतु आता या नवीन फिचरमुळे पेमेंट करणे अगदी सोपे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT