WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलशी संबंधित एक नवीन फीचर आले आहे. याच्या मदतीने, वापरकर्ते आता व्हॉईस कॉलवर 32 लोकांना जोडू शकतात. मात्र, सध्या ते काही देशांमध्ये रिलीज करण्यात आले आहे. WhatsApp ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, ते काही नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये कम्युनिटी टॅब, ईमोजी रिअॅक्शन, 2 GB फाईलचे ट्रान्स्फर आणि जवळपास 32 लोकंना एका ग्रुप कॉल मध्ये जोडण्याची सर्व्हिस देण्यात येणार होती.
तर, हे वैशिष्ट्य केवळ निवडक प्रदेशांमध्ये आणले गेले आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅप कॉलवर पूर्वी 8 लोक कनेक्ट केले जाऊ शकत होते, जे अॅप आता 32 लोकांपर्यंत वाढवत आहे. Wabetainfo ने याबाबत माहिती दिली आहे.
नवीन वैशिष्ट्य काय आहे?
रिपोर्टमध्ये याचा एक स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'आता ग्रुप कॉलवर 32 लोकांना अॅड करण्यासाठी सपोर्ट मिळणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलमध्ये 32 लोकांना जोडण्याच्या फीचरसोबतच यूजर्सना अपडेटेड डिझाइनही मिळेल. यामध्ये व्हॉइस मेसेजसाठी बबल आणि कॉन्टॅक्ट आणि ग्रुप्ससाठी माहिती स्कोअर यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळणार आहे. तसेच काही किरकोळ फीचर्स देण्यात आले आहेत. हे फिचर सध्या ब्राझीलमध्ये रिलीझ करण्यात आले आहे.
हे देखील पहा-
अनेक नवीन वैशिष्ट्ये येणार;
व्हॉट्सअॅपने नुकतेच कम्युनिटी फीचर जाहीर केले आहे. कदाचित ते या वर्षाच्या अखेरीस सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू शकते. कम्युनिटीच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या ग्रुप्सला एकाच ठिकाणी आणू शकाल. यासोबतच यूजर्सना 2GB पर्यंतच्या फाइल्स शेअर करण्यात येणार आहे.
सध्या, वापरकर्ते फक्त 25MB पर्यंत फाइल्स ट्रान्सफर करू शकतात. अलीकडे, व्हॉट्सअॅपचा paid subscription Plan देखील आला आहे. यामध्ये युजर्सना पैसे भरल्यावरच अतिरिक्त फीचर्स मिळू शकतील. ही सेवा सर्व वापरकर्त्यांसाठी नसून केवळ Business Account असलेल्या वापरकर्त्यांनाच ती मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.