जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि तातडीचा मेसेज पाठवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअपमध्ये अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. जगभरातील बहुतांश व्हॉट्सअप युजर्संना मेसेज पाठवण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी आणि मेसेजिंग ॲप उघडताना अडचणी आल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे आज दुपारी १ वाजताच्या सुमारास युपीआय (UPI) ट्रान्झेक्शनमध्ये तांत्रिक अडचण झाली होती. ५७ मिनिटानंतर युपीआय पूर्वपदावर येत सुरू झाले. मात्र, आता, सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास व्हॉट्सॲपमध्ये अडचण आल्याने नेटीझन्स युजर्सं काही काळ गोंधळल्याचं दिसून आलं. त्यामुळे, नेटीझन्स ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देत आहेत.
मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीच्या मेटा कंपनीने व्हॉट्सप खरेदी केली आहे. दरम्यान, आज सायंकाळी काही युजर्संना मेसेज पाठविण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी अडचण येत होती. त्यामुळे, डाऊनडिटेक्टरवरही अनेक व्हॉट्सअप युजर्संने व्हॉट्सअप डाऊन झाल्यासंदर्भात तक्रारी केल आहेत. व्हॉट्सअप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा मिम्स आणि मजेशीर विनोद शेअर होताना दिसून येत आहेत. तसेच व्हॉट्सअप डाऊन झाल्याची माहिती देखील अनेकांनी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.