WhatsApp Channel Features Saam tv
लाईफस्टाईल

WhatsApp Channel Feature Roll Out: Whatsappचं नवीन अपडेट! 'चॅनल फीचर' रोल आउट, आता व्यवसाय करणे होणार अधिक सोपे

How To Use WhatsApp Channel Features : इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने चॅनल्स हे नवीन फीचर आणले आहे.

कोमल दामुद्रे

WhatsApp New Feature Roll Out: Meta चे लोकप्रिय चॅटिंग अॅप WhatsApp जगभरातील लाखो लोक वापरतात. मोठ्या युजर ग्रुपच्या विविध गरजा लक्षात घेऊन कंपनी नवीन फीचर्स सादर करते. या वर्षात WhatsApp ने अनेक नवीन अपडेट आणले आहे.

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट आणत असते. या WhatsApp चे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. यावरुन आपल्या एकमेकांशी सहज संवाद साधता येतो. तुम्हीही हे चॅटिंग अॅप वापरत असाल तर हे नवीन अपडेट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

या नवीन अपडेटचा वापर हा अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे जे Instagram, Threads आणि Twitter सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्ससह लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.

1. व्हॉट्सअॅप चॅनल फीचरची सुविधा

व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांना चॅनेलची सुविधा देत आहे. या वैशिष्ट्यासह, वापरकर्ते या चॅटिंग अॅपवर त्यांचे स्वतःचे चॅनेल तयार करू शकतात आणि फॉलोअर्स (Followers) जोडू शकतात. यासह, इतर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांचे आवडते चॅनेल फॉलो करण्याची सुविधा मिळणार आहे.

कंपनीने चॅनल्स फीचरसाठी (Features) नवीन अपडेट जारी केले आहे. जिथे आतापर्यंत व्हॉट्सअॅप चॅनेलची सुविधा फक्त सिंगापूर आणि कोलंबियामध्ये राहणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध होती, अशातच यामध्ये आणखी काही नवीन देशांची नावेही या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. व्हॉट्सअॅपने आपल्या अधिकृत ट्विटर चॅनलद्वारे या नवीन अपडेटची माहिती दिली आहे.

2. व्हॉट्सअॅप चॅनेलची सुविधा कोणत्या देशांसाठी सुरू करण्यात आली?

कंपनीने एका ताज्या ट्विटमध्ये माहिती दिली आहे की व्हॉट्सअॅप चॅनेलची सुविधा आता आणखी 7 देशांसाठी सुरू करण्यात आली आहे.

इजिप्त, चिली, मलेशिया, मोरोक्को, युक्रेन, केनिया आणि पेरू येथे राहणाऱ्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप चॅनल फीचर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या यादीत भारताचे नाव अद्याप जोडलेले नाही.

व्हॉट्सअॅपच्या या सुविधेनंतर कंपनी लवकरच इतर देशांसाठीही व्हॉट्सअॅप चॅनेलची सुविधा सुरू करणार असल्याचे मानले जात आहे.

3. याचा फायदा कसा होईल?

व्हॉट्सअॅप चॅनेलमुळे अनेक नवीन बिझनेस करणाऱ्यांना नव्या संधी मिळू शकतात. यामध्ये आपण आपले चॅनेलविषयी अधिक माहीती देऊ शकतो. ज्यामुळे भविष्यात लाभ होऊ शकतो असे कंपनीचे मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT