आता कोणत्याही भाषेत वापरता येणार Whatsapp; कसे ते जाणून घ्या Saam TV
लाईफस्टाईल

आता कोणत्याही भाषेत वापरता येणार WhatsApp; कसे ते जाणून घ्या

WhatsApp ने भारतातील बाजापेठ आणि भारतीयांची WhatsApp बद्दलची लोकप्रियता लक्षात घेता त्यांनी अनेक प्रादेशिक भाषांचा समावेश अॅपमध्ये केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारत ही WhatsApp साठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे शिवाय भारत हा विविध प्रांताचा आणि असंख्य भाषेंचा देश आहे. देशातील जवळपास प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र प्रादेशिक भाषा आहे. आणि त्यामुळे भारतातील बाजापेठ आणि भारतीयांची व्हाटस अॅप बद्दलची लोकप्रियता लक्षात घेता व्हाटस्अॅपने देखील अनेक प्रादेशिक भाषांचा समावेश त्यांच्या अॅपमध्ये केला आहे. या समावेश केलेल्या भाषांमध्ये हिंदी, तमिळ, गुजराती, (Hindi, Tamil, Gujarati) कॅनेडियन, बंगाली अशा अनेक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. (Whatsapp can now be used in any language; Learn how)

मात्र या भाषांचा पर्याय उपलब्ध असताना देखील त्यांचा वापर कसा करायचा त्याबाबतीतल सेटींग्ज काय असतात याची माहिती आपण सविस्तरपणे दिलेली आहे. त्यामुळे आपण कोणत्याही मोबाईमध्ये त्या भाषा अक्टीव करु शकता. WhatsApp भाषा बदलण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे संपूर्ण स्मार्टफोनची (SmartPhon) भाषा बदलून आपण ती भाषा बदलू शकतो किंवा फक्त व्हॉट्सअॅपची भाषा आपण बदलू शकतो, तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही पर्याय निवडू शकता. आता ते बदल कसे करायचे याबाबतच्या वेगवेगळ्या पद्धती आपण समजावून घेऊयात...

हे देखील पहा -

पहिली पद्धत -

आपल्या स्मार्टफोनची संपुर्ण भाषा बदलने त्यासाठी व्हॉट्सअॅप स्वयंचलितपणे स्मार्टफोनच्या Default या Setting चा पर्याय सुरु केला तर तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही भाषेत WhatsApp आपोआप बदलेलं.

1) Android

तुम्ही Android मोबाईल फोन वापरत असाल तर खालील प्रमाणे सेटींग करा.

सेटिंग्ज → सिस्टम → भाषा आणि इनपुट → भाषा, असा पर्याय आला की त्यावरती क्लिक करुन तुम्हाला हवी असलेली भाषा तुम्ही निवडू शकता.

2) iPhone

iPhone चा वापर करणाऱ्यांसाठी सेटींग

iPhone Settings → जनरल → भाषा आणि प्रदेश → iPhone भाषा अशा

पद्धतीने क्लिक करत जाऊन अखेर हवी ती भाषा निवडून त्यावरती क्लिक केल्यावरती ती आपल्या वापरात येईल.

3) KaiOS

दरम्यान KaiOS च्या वापरकर्त्यांसाठी पुढील प्रमाणे भाषा सेट करता येईल...

सेटींग → वैयक्तिकरण निवडण्यासाठी स्क्रोल करा → खाली स्क्रोल करा आणि भाषा निवडा, भाषा निवडून त्यावरती Ok म्हणून चॅट्स → Application वरती क्लिक करुन ती हवी ती भाषा निवडून आपन ती Active करु शकतो.

अशा प्रकारे आपण कोणताही फोन वापरत असला आणि कोणत्याही भाषेमध्ये संवाद साधणारे असलात तरी व्हॉट्सअॅपने तुम्हाला तुमच्या भाषेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे वरती दिलेल्या माहितीनुसार भाषा निवडा आणि तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद साधत रहा.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT