WhatsApp Call Location Tracking google
लाईफस्टाईल

WhatsApp Security: WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग

WhatsApp Privacy: व्हॉट्सअ‍ॅप कॉलदरम्यान IP अ‍ॅड्रेसमुळे लोकेशन ट्रॅक होऊ शकते. Protect IP Address in Calls फीचर ऑन करून प्रायव्हसी सुरक्षित ठेवा.

Sakshi Sunil Jadhav

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. स्वत:च्या खाजगी कामांपासून ते व्यवसायापर्यंत लोक व्हॉट्सअ‍ॅप वापर करत आहेत. त्यामुळे त्यामध्ये अनेक महत्वाचे चॅट्स आणि कॉल्स असतात. अशातच एक गंभीर घटना समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे की, व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर बोलताना तुमचे लोकेशन ट्रॅक होऊ शकते.

अनेकांना व्हॉट्सअ‍ॅपची ही बातमी ऐकून धक्काच बसेल. पण हे वास्तव आहे. अनेकांना विश्वासू वाटणारे व्हॉट्सअ‍ॅप आता सिक्युरिटीमध्ये कमी पडेल का अशी चिंता सगळ्यांना आहे. कॉलदरम्यान हॅकर किंवा स्कॅमर तुमचा IP अ‍ॅड्रेस वापरून तुमचे अंदाजे लोकेशन शोधू शकतात. मात्र यावर उपाय म्हणून व्हॉट्सअ‍ॅपने एक खास सेफ्टी फीचर दिले आहे.

एकदा हे फीचर सुरू केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स अधिक सुरक्षित होतील. कोणताही हॅकर किंवा स्कॅमर कॉलच्या माध्यमातून तुमची लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये “Protect IP Address in Calls” नावाचे हे फीचर कॉलदरम्यान तुमचा IP अ‍ॅड्रेस लपवते. हे फीचर डीफॉल्टने बंद असते, त्यामुळे अनेक युजर्स असुरक्षित राहतात. हे फीचर ऑन केल्यास तुमच्या सर्व व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स थेट समोरच्या व्यक्तीपर्यंत न जाता आधी व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरद्वारे जातात. त्यामुळे कॉल करताना तुमचा IP अ‍ॅड्रेस समोरच्या व्यक्तीला दिसत नाही आणि लोकेशन ट्रॅक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

हे फीचर ऑन करणे खूपच सोपे आहे. सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप ओपन करा. त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करून सेटिंग्समध्ये जा. सेटिंग्समध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करा.

प्रायव्हसी सेक्शनमध्ये खाली स्क्रोल केल्यावर ‘Advanced’ हा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला “Protect IP Address in Calls” हे फीचर आढळेल. हे फीचर डीफॉल्टने बंद असते, ते ऑन करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT