WhatsApp Accounts Banned  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Accounts Banned : भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 65 लाख अकाउंट्स बॅन, तुम्ही देखील यात नाही ना ?

Why WhatsApp Account Ban : या चुकांमुळे झाले WhatsApp Account बॅन

कोमल दामुद्रे

WhatsApp Account Banned News : WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट आणत असते. या WhatsApp चे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. यावरुन आपल्या एकमेकांशी सहज संवाद साधता येतो.

अशातच एक बातमी समोर आली आहे की, व्हॉट्सअ‍ॅपने ६५ लाख भारतीयाचे अकाउंट्स बॅन केले आहेत. २०२१ च्या IT नियमानुसार सगळ्या सोशल मीडिया कंपन्यांना दर महिन्याला सुरक्षा अहवाल जारी करावा लागेल.

व्हॉट्सअॅपने (WhatsApp) मे महिन्याचा अहवाल जारी केला असून कंपनीने 1 मे ते 31 मे दरम्यान 65,08,000 खात्यांवर बंदी (Banned) घातली आहे. यापैकी 24,20,700 खाती कंपनीनेच कोणत्याही तक्रारीशिवाय बॅन केली आहेत. मे महिन्यात व्हॉट्सअॅपवर खाते बंद केल्याच्या ३,९१२ तक्रारी करण्यात आल्या होत्या, त्यापैकी २९७ खात्यांवर कंपनीने कारवाई केली आहे.

WhatsApp चे भारतात 500 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी, कंपनी चुकीच्या प्रकारच्या खात्यावर बंदी घालून दर महिन्याला सुरक्षा अहवाल जारी करते. एप्रिल महिन्यात व्हॉट्सअॅपने भारतात ७४ लाखांहून अधिक खाती (Account) बंद केली होती. व्हॉट्सअॅपचा गैरवापर, समजात तेढ निर्माण करणारे, फसवणूक किंवा इतर काही यांसारख्या WhatsApp वरील चुकीच्या गोष्टींमध्ये सहभाग असेल तर कंपनी तुमचे खाते देखील बंद करू शकते.

1. अपडेट व्हॉट्सअॅपमध्ये ही गोष्ट जोडण्यात आली आहे

व्हॉट्सअॅपने युजर्सना चॅट ट्रान्सफर करण्याचा नवा पर्याय दिला आहे, ज्याअंतर्गत ते गुगल ड्राइव्हशिवाय एका फोनवरून दुसऱ्या फोनवर चॅट ट्रान्सफर करू शकतात. यासाठी त्यांना नवीन फोनवर प्रदर्शित होणारा QR कोड स्कॅन करावा लागेल. तसेच दोन्ही स्मार्टफोनचे वायफाय आणि लोकेशन ऑन असावे. कंपनीने म्हटले आहे की या फीचरमुळे लोकांना लगेच चॅट ट्रान्सफर करण्यात मदत होते आणि त्यांचा वेळही वाचतो.

2. ट्विटरने 11 लाख अकाउंट बॅन केले होते

नवीन आयटी नियमानुसार, इलॉन मस्कची कंपनी ट्विटरने 26 एप्रिल ते 25 मे दरम्यान 1.1 दशलक्ष भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. Twitter ने गैरवर्तन/छळ, बाल लैंगिक शोषण, द्वेषपूर्ण आचरण, संवेदनशील प्रौढ सामग्री, बदनामी यांसारख्या मुद्द्यांवर कारवाई केली. कंपनीने या काळात दहशतवादाशी संबंधित एकूण 11,32,228 खाती आणि 1,843 खाती बंदी घातली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT