WhatsApp Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsAPP ची मोठी कारवाई, ७० लाख अकाऊंट केले बंद, तुम्हीही या चुका करू नका, अन्यथा..

WhatsAPP latest update : व्हॉट्सॅपने ७१ लाखांहून अधिक अकाऊंटधारकांवर मोठी कारवाई केली आहे. व्हॉट्सॅप पॉलिसीचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपने या कारवाईचा अहवाल जाहीर केला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने भारतात काही अकाऊंटवर मोठी कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपने भारतील काही खाती बंद केली आहेत. व्हॉट्सअॅपने एकूण ७१ लाख अकाऊंट बंद केले आहेत. त्यामुळे या अकाऊंटधारकांना व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही.

भारतातील ७१ लाख व्हॉट्सअॅप यूजर्सने पॉलिसीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपने मासिक अहवाल जारी केला आहे. मेटाचा मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅपने भारतात कारवाई केल्याचा मोठा खुलासा केला आहे. व्हॉट्सअॅपने १ एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ रोजी कारवाई केली आहे. या युजर्सने चुकीचे वापर केला. तसेच यापुढेही व्हॉट्सअॅप पॉलिसीचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

व्हॉट्सअॅपने एकूण ७१,८२,००० अकाऊंट बंद केले आहेत. या अकाऊंटवर एप्रिल महिन्यात कारवाई केली. दरम्यान, कंपनी अॅडवान्स मशीन लर्निंग आणि डेटा एनालाइज करते. यातून संशयित अकाऊंट शोधले जातात. व्हॉट्सअॅपचे जगभरात अब्जो युजर्स आहेत. या अॅपमधून एकमेकांना मेसेज, व्हिडिओ आणि ऑडिओ पाठवतात.

दरम्यान, या व्हॉट्सअॅपने या वर्षाच्या सुरुवातीपासूनच्या महिन्यापासून कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपने आतापर्यंत कोट्यवधी अकाऊंट बंद केले आहेत. भारतीय कायदे आणि व्हॉट्सअॅपच्या सेवेच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT