Remaining Oil Of Fried Food  Saam Tv
लाईफस्टाईल

Remaining Oil Of Fried Food : तळलेल्या पदार्थांच्या उरलेल्या तेलाचे काय कराल ? पुन्हा वापरायचे की, टाकून द्यायचे; जाणून घ्या

पदार्थ तळून झाले की उरलेल्या तेलाचा एक प्रश्न कायमच असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Remaining Oil Of Fried Food : पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो की उरलेल्या तेलाचं काय करायचं? कुणी म्हणतं ते तेल भाजीआमटीला वापरुन टाकावे. कुणी त्यातच पुन्हा पुन्हा पदार्थ तळते. कुणी ते तेल न खाता सरळ फेकून देते. यातलं खरंखोटं काय? तळलेल्या तेलाचं नेमकं करायचं काय?

आणि मुळात म्हणजे एकदा पदार्थ तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरावे का?

तर त्या प्रश्नाचं एकच उत्तर की एकदा आपण ज्यात पदार्थ तळला, ते तेल उरलं तर ते तेल अजिबात वापरू नये. असे पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असू शकते.

तळलेले तेल पुन्हा पुन्हा का वापरू नये?

१. तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असू शकते. त्या तेलाच्या पुर्नवापराने कॅन्सरसह अनेक घातक आजार होण्याची शक्यता असते.

२. पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरल्याने खराब कॉलेस्टेरॉल वाढते.

३. पुन्हा पुन्हा गरम केलेल्या तेलाच कॅन्सर कॉजिंग एजंट, पॉलिसायकलिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतात ते हानीकारक घटक असतात. त्यानं कर्करोग होण्याचा धोका बळावतो.

४. अनेकदा गरम केल्यानं तेलात विषारी प्रक्रिया सुरु होते.

५. त्यातले चांगले घटक कमी होतात.

६. म्हणून पुन्हा पुन्हा तळलेले तेल आरोग्याला अतिशय हानीकारक असते ते वापरू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्याला फटकारलं; भर मिटिंगमध्येच उपायुक्तांना आला हृदयविकाराचा झटका

Maharashtra News Live Update : परळीच्या मिरवट गावात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग

लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹२००० मिळणार; मुंबई महापालिकेने आखला मास्टर प्लान

Home Workout की Gym, वजन कमी करण्यासाठी कोणता ऑप्शन आहे सर्वात बेस्ट?

MLC Election: राज्यात पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स', महायुतीचे शेकडो नगरसेवक ठाण्यात; राजकीय घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT