Travelling Tips, Travel tips, Travel care, Self care tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Travelling Tips : फिरायला जाताना मळमळ किंवा डोकेदुखीचा त्रास जडला तर काय कराल?

पावसाळा सुरू झाला की, आपल्याला बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असते.

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाळा सुरू झाला की, आपल्याला बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असते. हिरव्यागार निसर्गात फिरायला जाण्याची मज्जा काही औरच.

हे देखील पहा -

बऱ्याचवेळा आपण फिरण्याचे प्लॅन बनवतो किंवा आपल्याला नोकरीच्या ठिकाणाहून बाहेर फिरायला घेऊन जातात. अनेकदा इच्छा असूनही आपल्या बाहेर फिरायला जाता येत नाही. बाहेर फिरायला जायचे म्हटले की, अनेकांना प्रवासाचा त्रास किंवा डोकेदुखी उद्भवते त्यामुळे ते जाण्यास सतत टाळत असतात. काहींना प्रवासाची सवय नसल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा त्रास जाणवू लागतो. फिरायला गेल्यानंतर डोकेदुखी किंवा मळमळ होत असेल तर काय करायला हवे हे जाणून घ्या.

१. प्रवासाला जाण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच आपल्याला प्रवासात जो काही त्रास होत असेल ते डॉक्टरांना सविस्तरपणे सांगा. त्यामुळे डॉक्टर आपल्याला योग्य ते औषध देतील. तसेच प्रवासा दरम्यान आपण कोणते अन्नपदार्थ खायला हवे हे देखील विचारा. चॉकलेट किंवा च्वुइंगमचे सेवन करु शकतो का हे देखील विचारा.

२. प्रवासाच्या (Travel) दरम्यान आपला डोकेदुखीचे प्रमाण वाढू लागते त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. कधीकधी गाडीत बसल्यामुळे हा त्रास वाढतो तर कधी उंच ठिकाणी गेल्यानंतर देखील आपले डोकेदुखी होते. त्यासाठी आपण आपल्यासोबत औषध ठेवायला हवे. तसेच डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तुळशी आणि व आल्याचा काढा बनवून पिल्याने आराम मिळतो.

३. प्रवासादरम्यान अनेकांना उलट्यांचा त्रासही सहन करावा लागतो. हे मोशन सिकनेसमुळे असू शकते. हे टाळण्यासाठी प्रवासाला जाण्यापूर्वी हलके अन्न खाणे आवश्यक आहे. उलट्यांसाठी अनेक औषधे देखील उपलब्ध आहेत. याशिवाय काळी मिरी खाणे, लिंबू-मीठ चाटणे किंवा लिंबाचे लोणचे खाणे यांसारखे घरगुती (Home) उपाय करूनही उलट्यांचा त्रास टाळता येतो.

४. पीरियड क्रॅम्प्स ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला प्रवासादरम्यान अधिक त्रासदायक ठरते. त्यामुळे आपल्याला प्रवासाचा आनंद घेता येत नाही. मासिक पाळीदरम्यान पाठदुखी, पोटदुखी आणि कधीकधी तापही येतो. अशावेळी प्रवासात आपण आल्याचा चहा किंवा औषधे घ्यावी.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या PA अनंत गर्जेच्या मुसक्या आवळल्या, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी कारवाई

Til Ladoo Recipe : तिळाचे लाडू नेहमी कडक होतात? ट्राय करा 'ही' रेसिपी

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

Famous Actress Wedding : 'क्यूंकी सास भी...'; फेम अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ, पाहा खास PHOTOS

Ladki Bahin Yojana: अजूनही eKYC केली नाही,लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० येणार की नाही? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT