Blood sugar spike saam tv
लाईफस्टाईल

Blood sugar spike: रक्तातील साखर झपाट्याने वाढली तर काय कराल? घरच्या घरी या सोप्या पद्धतींचा करा वापर

What to do if blood sugar rises: मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे, जो जगभरात वेगाने वाढत आहे. रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) अचानक वाढणे हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक गंभीर समस्या ठरू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

रक्तातील साखरेचं प्रमाण (Blood Sugar Level) जास्त वाढणं ही गंभीर आरोग्याची समस्या आहे. ही समस्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुंतागुंतीची ठरू शकते. रक्तातील साखर दीर्घकाळ नियंत्रित ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि औषधोपचार महत्त्वाचे असले तरी काही वेळा त्वरित उपायांची गरज भासते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चुकीचा आहार, ताणतणाव किंवा औषधं विसरणं यामुळे अचानक साखरेत वाढ होऊ शकते. अशावेळी योग्य पद्धतीने रक्तातील साखर खाली आणणे आवश्यक ठरते. वाढलेली साखर तातडीने कमी करण्यासाठी उपाय, त्यांची खबरदारी आणि साखर नियंत्रणात ठेवण्याचे मार्ग काय आहेत ते जाणून घेऊया

रक्तातील साखर वाढल्याची लक्षणं ओळखा

साखर वाढल्यावर शरीर काही संकेत देतं. त्याकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे.

  • वारंवार लघवी होणं

  • प्रचंड तहान लागणं

  • दृष्टी धूसर होणं

  • अंगावर प्रचंड थकवा किंवा झोप येणं

  • डोकेदुखी

लगेच पाणी प्या

भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त साखर लघवीमार्गे बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर Dehydrate झाल्यास साखर नियंत्रित करणं आणखी अवघड होतं. म्हणून लगेच २–३ ग्लास पाणी प्यावं.

हलका शारीरिक व्यायाम करा

व्यायाम हा रक्तातील साखर कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पायी चालणं, योगाभ्यास, सायकलिंग असे हलके व्यायाम त्वरित परिणाम करतात. त्यामुळे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखरेचा वापर योग्य पद्धतीने होतो.

इन्सुलिन घ्या

जे रुग्ण इन्सुलिन घेतात त्यांनी डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे रॅपिड-ॲक्टिंग इन्सुलिन घेतल्यास १५–३० मिनिटांत साखरेचं प्रमाण खाली येऊ शकतं. मात्रेत चूक होऊ नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला पाळणं आवश्यक आहे. रक्तातील साखरेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी ग्लुकोमीटर किंवा कंटीन्युअस ग्लुकोज मॉनिटर (CGM) वापरणे उत्तम.

व्यायाम व ध्यानधारणा

ताणतणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन वाढतं आणि त्यामुळे रक्तातील साखरही वाढते. अशावेळी ध्यानधारणा, खोल श्वसनाचा सराव किंवा मेडिटेशन केल्यास मन शांत होतं आणि हळूहळू साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.

अर्ध्या–एका तासाने साखर तपासा

रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपाय करत असताना दर ३०–६० मिनिटांनी तपासणी करणं आवश्यक आहे. यामुळे कोणता उपाय परिणामकारक ठरत आहे हे लक्षात येतं. जर साखरेचं प्रमाण खाली आलं नाही तर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

गोड पदार्थ टाळा

खालील पदार्थ अजिबात खाऊ नयेत –

  • मैद्याची चपाती किंवा पास्ता

  • साखरयुक्त कोल्ड ड्रिंक्स

  • बिस्किटं, केक, मिठाई

हे पदार्थ तात्काळ साखर वाढवतात आणि परिस्थिती अधिक गंभीर करतात. त्याऐवजी प्रथिनयुक्त आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ खावेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT