Home remedy for shoe bite ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

नवीन सँडल किंवा बूट पायाला चावल्यानंतर काय कराल ?

आपल्या लूक सोबत आपण आपल्या सँडल किंवा बूटांना प्राधान्य देतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बऱ्याचदा ट्रेंडनुसार (Trend) आपण नवीन सँडल किंवा बूट विकत घेतो. आपल्या लूक सोबत आपण आपल्या सँडल किंवा बूटांना प्राधान्य देतो.

हे देखील पहा-

आपण खूप हौसेने नवीन चप्पल विकत घेतो आणि ती घालतो. बऱ्याचदा नवीन चप्पल पहिल्यांदा घातल्यानंतर ती लागते. चप्पल चावल्यावर पायाला खूप त्रास होतो. यावर उपाय म्हणून आपण लगेचच एखादी क्रिम किंवा बँडेज लावतो. आपण निवडलेल्या सँडलमुळे पायाला जखमा होतात. अशावेळी इतर कोणतीही सँडल पायात घालणे कठीण होते. सँडलमुळे पायाला कापले जाते, सूज येते, फोड येतात किंवा जखमा होतात. पायात सँडल अधिक घट्ट किंवा त्यांचा रुंदीमुळे पायांना ठेच लागते. अशावेळी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया

या घरगुती टिप्सचा (Tips) वापर करा.

१. नवीन चप्पल पायला चावल्यानंतर जखम होते. त्यातून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलांचा वापर आपण करू शकतो. पायावर जखम झाल्यास खोबऱ्याच तेल लावल्यास आराम मिळेल.

२. पायांच्या वेदना आणि जळजळ कमी करण्यास मध मदत करेल. मधाचा वापर केल्याने पायांना ओलावा येऊन आपले पाय लवकर बरे होतील. तसेच, जखमेवर ऑलिव्ह ऑइलमध्ये मध मिसळून लावू शकता.

३. तांदळाचे पीठ पायातील मृत त्वचेच्या पेशी काढून जखमा भरून काढण्यासाठी आणि जखम दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी तांदळाच्या पिठाची पेस्ट करुन जखमेवर लावल्यास आराम मिळतो.

४. कोरफड त्वचेचा अनेक समस्येवर लाभदायक ठरते. कोरफड जेल पायांच्या जखमेवर लावल्यास जखम भरण्यास मदत होते.

५. चप्पल चावल्यानंतर पायांना फोड आणि खाज येते अशावेळी आपण रात्री झोपताना जखमेवर थोडीशी टूथपेस्ट लावावी व सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने धुवावी. त्यानंतर त्यावर पेट्रोलियम जेली लावावी.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Fort : उभ्या कातळ पायऱ्या अन् दोन्ही बाजूंना खोल दरी! 'या' किल्ल्याची चढाई पाहूनच उडेल धडकी

Tharala Tar Mag : गरोदर सायली बनली लेडी सिंघम, अर्जुनसोबत सिक्रेट मिशनला सुरुवात, 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट | VIDEO

High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे तेलकट पदार्थांपेक्षा ही 1 चूक ठरतेय कारणीभूत, हृदयाच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी लक्ष द्या, डॉक्टरांचा इशारा

Low Blood Sugar Signs And Symptosm: थकवा, घाम अन् अचानक भूक लागणे? शरीरातील साखर कमी झाल्यास दिसतात ही लक्षणं

Shocking : धक्कादायक! प्रसिद्ध मॉडेलवर धारदार शस्त्राने हल्ला करत संपवलं, जिम ट्रेनर घरातला घुसला अन्...

SCROLL FOR NEXT