Normal Cholesterol Level saam tv
लाईफस्टाईल

Normal Cholesterol Level: 10 पैकी 6 व्यक्तींना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या; सामान्यपणे तुमची कोलेस्ट्रॉल लेवल किती असली पाहिजे?

What is Normal Cholesterol Level: कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असलं पाहिजे हे तुम्हाला माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार वाढतायत. यामध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, लोक त्यांच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. परिणामी ज्यामुळे त्यांना भविष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरात हार्मोन्स तयार करण्यात मदत करतं. यामुळे पचनास देखील मदत होते. परंतु तुम्हाला माहितीये का, जर त्याचं प्रमाण शरीरात वाढलं तर ते आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण करू शकतं. कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असलं पाहिजे हे तुम्हाला माहितीये का?

किती असली पाहिजे कोलेस्ट्रॉल लेवल?

लीलावती रूग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विद्या सुरतकल यांनी सांगितलं की, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांना सायलेंट किलर म्हणून ओळखलं जातं. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या 10 पैकी 7 तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक आहे. शिवाय, उच्च कोलेस्टेरॉलची समस्या ही पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही सारख्याच प्रमाणात पहायला मिळतेय. उच्च कोलेस्ट्रॉल पातळी तुमच्या हृदयावर परिणाम करतं आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांना आमंत्रण देते.

डॉ. विद्या यांनी पुढे सांगितलं की, कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये प्लाक तयार झाल्याने छातीत दुखू शकतं. त्यामुळे वेळोवेळी लिपिड प्रोफाइल चाचणी करण, ज्याला कोलेस्ट्रॉल चाचणी किंवा लिपिड पॅनेल देखील म्हणतात. हे कोलेस्ट्रॉलची पातळी मॅनेज करण्यासाठी आणि हृदयरोग तसंच स्ट्रोकचा धोका किती आहे हे दर्शविण्यास मदत करतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी कोलेस्ट्रॉलची पातळी 200 mg/dL पेक्षा कमी असली पाहिजे. LDL 100 mg/dL पेक्षा कमी आणि HDL पुरुष आणि स्त्रियांसाठी 40 mg/dL पेक्षा जास्त असावा.

कोलेस्ट्रॉल चाचणी करण्यात होते टाळाटाळ

मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिकचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. संदीप बॅनर्जी म्हणाले की, उच्च कोलेस्ट्रॉल पातळीमुळे 18 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये भविष्यात हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या हृदयविकाराच्या समस्या सर्वसामान्यांच्या तुलनेने अधिक असतो. अगदी घरी किंवा दवाखान्यात रक्तदाब तपासण्याचा पर्याय निवडला जातो आणि कोलेस्ट्रॉलकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. दर महिन्याला, 18 ते 25 वयोगटातील केवळ 7 ते 10 तरुणांची कोलेस्ट्रॉलची पातळी तपासली जाते आणि जागरूकतेच्या अभावामुळे ही संख्या कमी आहे.

डॉक्टरांच्या शिफारशीनुसार, दर 8-9 महिन्यांनी लिपिड प्रोफाइल चाचणी करणं आवश्यक आहे आणि पौष्टिक आहार घेणं, व्यायाम करणं आणि चांगली झोप घेणं गरजेचं असून संतुलित जीवनशैलीचे पालन करणं आवश्यक आहे.

झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित गंगवानी म्हणाले की, उच्च कोलेस्ट्रॉलची पातळीची समस्या आता तरुणांमध्येही मोठ्या संख्येने दिसून येते. या प्रवृत्तीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, ज्यामुळे ऱ्हदयावर हानिकारक परिणाम होतात. 10 पैकी 6 स्त्रिया आणि पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचं दिसून येते. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि अनुवांशिकता तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी लिपिड चाचणीद्वारे करणे फायदेशीर ठरू शकते. संतुलित आहाराचे सेवन करणे, दररोज व्यायाम करणे, हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे सेवन करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishabh Pant Update : ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार, टीम इंडियात कधी होणार एन्ट्री?

Bharti Singh Pregnancy: कॉमेडियन भारती सिंग ४१व्या वर्षी पुन्हा होणार आई; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Maharashtra Politics: महायुती आणि मविआची रणनीती काय? पालिका निवडणुका स्वबळावर की युतीत?

Maharashtra Live News Update : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा माज! भररस्त्यात गांजा ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT