Normal Blood Sugar Level saam tv
लाईफस्टाईल

Blood Sugar Level: नॉर्मल ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? मधुमेहाचा धोका कोणत्या पातळीत मानला जातो?

Normal Blood Sugar Level: प्रत्येक वयोगटातील लोकांना मधुमेहाचा फटका बसलेला दिसतोय. रक्तातील साखरेची पातळी किती वाढली हे मधुमेह मानला जातो याची तुम्हाला माहिती आहे का?

Surabhi Jayashree Jagdish

केवळ देशात नाही तर संपूर्ण जगात मधुमेहाचे रूग्ण वाढताना दिसतायत. आजकाल मधुमेह हा एक सामान्य आणि धोकादायक आजार झाला आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांना मधुमेहाचा फटका बसलेला दिसतोय. केवळ प्रौढ किंवा वयस्कर नाही तर लहान मुलांमध्येही मधुमेहाची समस्या दिसून येतेय. जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे याचे प्रमुख कारण आहे.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लड शुगर लेवल म्हणजेच रक्तातील साखरेच्या पातळीकडे लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे. रक्तातील साखरेची पातळी किती वाढली हे मधुमेह मानला जातो याची तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला तुमची सामान्य रक्तातील साखरेची पातळी किती असावी हे जाणून घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

नॉर्मल ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? What Should The Normal Blood Sugar Level Be?

रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर लेवल वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये मोजली जाते. यामध्ये रिकाम्या पोटी, खाल्ल्यानंतर आणि HbA1c चाचणीद्वारे याची मोजणी केली जाते.

रिकाम्या पोटी (Fasting Blood Sugar):

नॉर्मल: 70-99 mg/dL

प्राडायबिटीज: 100-125 mg/dL

डायबिटीज: 126 mg/dL यापेक्षा जास्त

खाण्याच्या २ तासानंतर (Postprandial Blood Sugar):

नॉर्मल: 140 mg/dL पेक्षा कमी

प्रीडायबिटीज: 140-199 mg/dL

डायबिटीज: 200 mg/dL यापेक्षा जास्त

HbA1c टेस्ट

नॉर्मल: 5.7 टक्क्यांपेक्षा कमी

प्रीडायबिटीज: 5.7 टक्के - 6.4 टक्के

डायबिटीज: 6.5 टक्क्यांपेक्षा जास्त

मधुमेह असल्यास ब्लड शुगर किती वाढू शकते?

  • मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. आहार, योग्य वेळी औषधं घेणं, शारीरिक हालचाली आणि ताणतणाव अशा अनेक घटकांवर या गोष्टी अवलंबून असतात.

  • जर एखादी व्यक्ती मधुमेहासाठी उपचार घेत नसेल, तर त्याची फास्टिंग शुगर लेवल 200 mg/dL पेक्षा जास्त असू शकते.

  • जेवणानंतर साखरेची पातळी 300 mg/dL किंवा त्याहून अधिक असू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT