Diet for 30 to 40 Year Old Male, Diet chart, Health tips
Diet for 30 to 40 Year Old Male, Diet chart, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

३० ते ४० वयोगटातील पुरुषांचे डाएट कसे असायला हवे ?

कोमल दामुद्रे

मुंबई : वजांनाबद्दल बोलायचे झाले तर नेहमी आपण स्त्रियाबद्दलच बोलत जातो. वयोमानानुसार स्त्री व पुरुष दोघांच्याही शारीरिक व मानसिक अवस्थेत बदल होत असतात.

हे देखील पहा -

बदलत्या जीवनशैलीत आपल्याला खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजाराच्या समस्या उद्भवतात. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील लोक जास्त प्रमाणात आढळून येतात. या वयात पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण, वजन वाढणे व मधुमेहांसारखे अनेक आजार आढळून येतात. यासाठी पुरुषांनी आपल्याला आहारात कोणते पदार्थ असायला हवे हे देखील जाणून घेतले पाहिजे.

१. या वयातील पुरुषांनी डाएट केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येतो. तसेच यात आपण सॅच्युरेटेड फॅट, कमी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण, फळे, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ शकतो.

२. या आहारात आपण कडधान्य, मासे, काजू यांचा समावेश करु शकतो. तसेच, यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसोबत प्रोटीन आणि फायबरचे प्रमाणही जास्त असते. कमी मीठ आणि कमी सोडियम पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो.

३. या वयात पुरुषांनी कडधान्य आणि डाळींचे सेवन करायला हवे. यात तृणधान्य, गव्हाचा ब्रेड, ब्राउन राईस यांचा देखील समावेश आहारात करु शकतो.

४. तसेच दररोज फळे व भाज्या खाव्यात. यात टोमॅटो, गाजर, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, सफरचंद, अननस आणि नासपती खाणे आवश्यक आहे. त्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आदी हंगामी फळे (Fruit) आणि भाज्या खाल्ल्याने आवश्यक ते पोषक घटक मिळतील.

५. मांसामध्ये प्रथिने, ब जीवनसत्त्वे (Vitamins), लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. शकतात. याचे पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी ते बेक, उकळून किंवा भाजून खाऊ शकतो. सॅल्मन, हेरिंग आणि ट्यूना सारख्या हृदयासाठी निरोगी मासे खा. या माशांमध्ये ओमेगा -३ फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

SCROLL FOR NEXT