Diwali 2024 saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2024: दिवाळीनंतर पुजा केलेल्या दिव्यांचं काय केलं पाहिजे? नकळतही 'या' चुका करू नका, पडेल महागात

Diwali 2024: दिवाळीच्या दिवशी लोक विधीनुसार आणि संध्याकाळी शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पुजा करतात. जाणून घेऊया दिवाळीच्या दिवसानंतर दिव्यांचं काय केलं पाहिजे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या देशभरात सगळीकडे दिवाळीचा उत्साह दिसून येतोय. दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. या सणाच्या दिवशी लोक विधीनुसार आणि संध्याकाळी शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पुजा करतात. यासोबतच गणपती बाप्पाची देखील पुजा केली जाते. लोक अनेक दिवस आधीच दिवाळीची तयारी सुरू करतात.

दिवाळीच्या दिवशी संपूर्ण घर दिव्यांनी सजवतो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो. तुम्ही तुमचं घर दिव्यांनी सजवता, लक्ष्मीपूजनाच्या वेळी सुंदर दिवे लावता, पण दिवाळीनंतर या सर्व दिव्यांचं तुम्ही काय करता? तुम्ही त्यांना फेकून देता का? तर ही चूक अजिबात करू नका. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीच्या दिवसानंतर दिव्यांचं काय केलं पाहिजे.

दिवाळीनंतर दिव्यांचं काय केलं पाहिजे?

  • दिवाळीच्या दिवशी प्रत्येक जण आपले घर सुंदर दिव्यांनी सजवतो. लक्ष्मी पूजनातही दिव्यांचा वापर केला जातो. पण दिवाळीनंतर लोक हे दिवे इकडे तिकडे टाकले जातात. मात्र असं करणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं.

  • दिव्यांमध्ये माता लक्ष्मी वास असतो. अशा परिस्थितीत त्यांना फेकणं टाळलं पाहिजे. तुम्ही जुने दिवे जपून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तो दिवा मंदिरात लावा

  • लक्ष्मी आणि गणपतीच्या पूजेत लावण्यात येणारे दिवे तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता. असं केल्याने नकारात्मकता टाळता येईल.

  • दिवाळीच्या दिवशी लावण्यात येणारे दिवे तुम्ही मातीमध्ये पुरु शकता. काही लोक हे दिवे कुंभाराला परत दानही करतात. यामुळे सुख समृद्धी मिळते.

  • जर तुमच्या घराजवळ नदी किंवा तलाव नसतील तर हे दिवे घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा, जिथे कोणी पाहू शकणार नाही. असं करणं देखील हे शुभ मानलं जातं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT