Unified Pension Scheme Saam TV
लाईफस्टाईल

Unified Pension Scheme : काय आहे यूनिफाइड पेन्शन स्कीम; योजनेचा लाभ केव्हापासून घेता येणार?

What is Unified Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. आत ही योजना नेमकी काय आहे? योजना नेमकी केव्हा सुरू होणार? या सर्वांची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. आत ही योजना नेमकी काय आहे? योजना नेमकी केव्हा सुरू होणार? या सर्वांची माहिती आज जाणून घेणार आहोत.

यूनिफाइड पेन्शन स्कीम आहे तरी काय?

प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर योग्य ती खात्रीशीर रक्कम, पेन्शन मिळावी यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केल्याचं म्हटलं आहे. नवीन पेन्शन योजनेनुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या पागाराच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. त्यामुळे नव्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मिळालेलं हे मोठं गिफ्ट ठरणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जगभरात असलेल्या पेश्नन योजनांचा आढावा घेतल्यानंतर यूनिफाइड पेन्शन योजनेचा पर्याय सुचवला होता. त्यानुसार यूनिफाइड पेन्शन स्कीमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कॅबिनेटने मंजूरी दिली आहे.

यूनिफाइड पेन्शन योजनेतील महत्वाच्या गोष्टी

यूपीएस योजनेनुसार, निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती होण्याआधी शेवटच्या वर्षातील 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्मक दिली जाणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 60 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ केव्हा मिळणार

यूपीएस योजनेनुसार, कर्मचाऱ्यांनी 25 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने 25 वर्षांपेक्षा कमी सेवा केली असल्यास त्याला 10 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ वर अजून एक गुन्हा दाखल

Aus vs Ban : ऑस्ट्रेलियाची धमाकेदार कामगिरी; बांगलादेशला धूळ चारत विश्वचषकाच्या सेमी फायलमध्ये एन्ट्री

Rich People: श्रीमंत व्यक्ती रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करतात?

Shocking : डोक्यावर हातोड्याने वार करत बायकोची हत्या, दुसऱ्या दिवशी आढळला झाडाला लटकलेला नवऱ्याचा मृतदेह

Nashik Police Bulldozer Action:नाशिकमध्ये 'उत्तर प्रदेश' पॅटर्न, बड्या राजकीय नेत्याचं साम्राज्य जमीनदोस्त; कारण काय?

SCROLL FOR NEXT