International Day of Peace: आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचे महत्व काय? जाणून घ्या... Saam Tv News
लाईफस्टाईल

International Day of Peace: आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचे महत्व काय? जाणून घ्या...

मानवतेला, मानवी मुल्यांना वाचवण्यासाठी आणि जगभरात शांतता नांदावी यासाठी जागतिक शांतता दिवस (International Day of Peace) साजरा केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज २१ सप्टेंबर आतरराष्ट्रीय शांतता दिनी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. मानवतेला, मानवी मुल्यांना वाचवण्यासाठी आणि जगभरात शांतता नांदावी यासाठी जागतिक शांतता दिवस साजरा केला जातो. २१ सप्टेंबर १९८१ रोजी पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे हा दिवस साजरा केला गेला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. (What is the significance of International Day of Peace? Find out ...)

हे देखील पहा -

जगातील सर्व देशांमध्ये आणि लोकांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, जगातील माणसं आनंदी आणि गुण्यागोविंदानं सुखी राहावे यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९८१ साली 'लोकांच्या शांतीचा हक्क' हा विषय घेऊन पहिल्यांदा जागतिक शांतात दिवस साजरा केला होता. प्रत्येक वर्षी २१ सप्टेंबरला शांतता दिवस साजरा करण्यासाठी एक स्पेशल थीम असते. २०१९ मध्ये ‘क्लायमेट अॅक्शन फॉर पीस’ ही थीम होती. तर यंदाच्या २०२१ या वर्षी (Recovering better for an equitable and sustainable world)

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा जगभरातील शाळा, महाविद्यालयं आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. भारतात आजच्या दिवशी पांढऱ्या कबुतरांना आकाशात मुक्त करण्यात येतं. पांढरी कबुतरं ही शांतीचे प्रतिक मानण्यात येतात. जगभरात शांतीचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे साहित्य, संगीत, चित्रपट आणि खेळाच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Ananya Panday: बे इज बॅक; अनन्या पांडेने केला लूक चेंज, पाहा ग्लॅमरस फोटो

Tariff: जगात पुन्हा खळबळ; ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतावर काय होणार परिणाम?

मराठा-धनगर समाजाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतोय का? अंजनगाव प्रकरणावर मनोज जरांगे पाटलांना वेगळाच संशय

Rajpal Yadav: 'मला पुन्हा जेलमध्ये पाठवा...' चेक बाऊन्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव भावूक; न्यायाधीशांनी फटकारले

SCROLL FOR NEXT