risk of infertility due to PCOS saam tv
लाईफस्टाईल

PCOS मुळे वंध्यत्वाचा धोका कितपत? महिला आई होऊ शकतात का?

Polycystic Ovary Syndrome : पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोम ही समस्या महिलांमध्ये आता सामान्यपणे दिसून येते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तब्बल ९० टक्के महिलांना पीसीओएसच्या त्रासामुळे वंध्यत्व येऊ शकतं.

Surabhi Jagdish

चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल महिलांना अनेक प्रकारचे त्रास होतात. यामधील बऱ्याच समस्या या मासिक पाळीशी संबंधित असतात. यामध्ये आजकाल प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे PCOS . पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोम ही समस्या महिलांमध्ये आता सामान्यपणे दिसून येते. यामध्ये महिलांना वजन वाढीची तक्रार जाणवते. (What causes PCOS in females?)

PCOS असणाऱ्यांपैकी जवळपास ४० टक्के महिलांचं वजन वाढतं. यामध्ये अँड्रोजेन नावाचं एक मेल हॉर्मोन असून या समस्येमध्ये महिलांमध्ये अँडोजेनची पातळी वाढते. त्यामुळे अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडू शकत नाही. परिणामी पिरीयड्स वेळेवर येत नाहीत.

यासंदर्भात बोलताना स्त्रिरोगतज्ज्ञ आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. हितेंद्रसिंग राजपूत यांनी सांगितलं की, पीसीओडी हा आजार आजकाल महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येतो. हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे हा त्रास असून तो मासिक पाळीशी संबधित समस्या आहे. यावेळी १० पैकी तब्बल ६ महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. शिवाय या समस्येमुळे वंध्यत्वााचा धोकाही वाढतो. तब्बल ९० टक्के महिलांना पीसीओएसच्या त्रासामुळे वंध्यत्व येऊ शकतं.

PCOS मुळे वंध्यत्वाचा धोका किती असतो?

पीसीओएसचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होताना दिसतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या समस्येने ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये स्त्री बीजाची उत्पत्ती होऊ शकत नाही. गर्भाशयामधील एस्ट्रोजेन हार्मोनच्या अतिउत्पादनामुळे गर्भ राहण्यासाठी महत्वपूर्ण असलेलं बीजांड नियमित तयार होत नाही. परिणामी गर्भधारणा होणं अशक्य असतं. (How PCOS affect daily routine life?)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पीसीओएसमुळे वंध्यत्वाचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पीसीओएस असणाऱ्या महिला आई होऊ शकतात का, हा प्रश्न प्रामुख्याने समोर येतो. या प्रश्नाचं उत्तर देखील तज्ज्ञांनी दिलं आहे.

PCOS चा त्रास असलेल्या महिलांना देखील मातृ्त्वाचं सुख मिळू शकतं. योग्य पद्धतीचे उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे हे शक्य आहे.
डॉ. हितेंद्रसिंग राजपूत, स्त्रिरोगतज्ज्ञ आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ

PCOS चा त्रास असलेल्या महिला आई होऊ शकतात का?

डॉ. राजपूत यांच्या माहितीनुसार, ज्या महिलांना PCOS चा त्रास आहेत त्या आई होऊ शकत नाही, असं नाही. हा त्रास असलेल्या महिला कंसिव्ह करू शकतात. यावेळी योग्य त्या उपचारांनंतर आणि जीवनशैलीत चांगले बदल केल्यानंतर या महिला आई होऊ शकतात. उपचारांनंतर काही काळ लागतो मात्र यामुळे महिलांच्या हाती चांगले निकाल येऊ शकतात.

PCOS उपचार कसे केले जातात? (PCOS can go away?)

PCOS हा कोणताही आजार नाहीये तर तो महिलांच्या शरीरात होणार एक बदल आहे. त्यामुळे पीसीओएस हा बरा होऊ शकत नाही. मात्र उपचांरानुसार आपण तो नियंत्रणात आणू शकतो. ही समस्या नियंत्रणात आणण्यासाठी औषधं दिली जातात. त्याचप्रमाणे महिलांना जीवनशैलीत बदल करण्याता सल्ला दिला जातो, असंही डॉ. राजपूत यांनी सांगितलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT