Neck pain causes saam tv
लाईफस्टाईल

Text neck syndrome: मोबाईलच्या वापरामुळे वाढतोय ‘टेक्स्ट नेक’चा धोका, वेदनांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

Neck pain causes: मोबाईल आणि लॅपटॉपचा जास्त वापर केल्याने ‘टेक्स्ट नेक’ची समस्या वाढत आहे. चुकीच्या पोश्चरमुळे मानेवर ताण येतो आणि वेदना निर्माण होतात. योग्य सवयी, व्यायाम आणि स्क्रीन टाइम कमी करून या समस्येपासून बचाव करता येतो.

Surabhi Jayashree Jagdish

हल्लीच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कामाच्या ठिकाणी, शिक्षणासाठी, मनोरंजन आणि सोशल मीडियाच्या वापरासाठी स्क्रिनचा पाहण्याची सवय अनेकांना लागली आहे. मात्र, याच सवयीमुळे ‘टेक्स्ट नेक’ ही समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. डॉक्टरांच्या मते, चुकीच्या पोश्चरमध्ये दीर्घकाळ मोबाईल वापरल्याने मानेवर ताण येतो आणि त्यामुळे विविध शारीरिक तक्रारी निर्माण होतात.

‘टेक्स्ट नेक’ म्हणजे नेमके काय?

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अनुप गाडेकर यांनी सांगितलं की, ‘टेक्स्ट नेक’ म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपकडे सतत खाली मान वाकवून पाहण्यामुळे मानेवर अतिरिक्त ताण येतो. मान सरळ असताना तिच्यावर सुमारे ४-५ किलो वजनाचा ताण असतो. मान ३० ते ६० अंशांनी खाली झुकवल्यास हा ताण २०-२५ किलोपर्यंत वाढू शकतो. दीर्घकाळ असा ताण राहिल्यास मानेचे स्नायू, लिगामेंट्स आणि स्पाईनवर याचा परिणाम होतो.

लक्षणं कोणती?

‘टेक्स्ट नेक’ची लक्षणे सुरुवातीला सौम्य असली तरी दुर्लक्ष केल्यास भविष्यात ती गंभीर रुप धारण करु शकतात.

  • मान आणि खांद्यामध्ये सततच्या वेदना

  • डोकेदुखी आणि मान आखडणं

  • खांदे पुढच्या दिशेने झुकणं

  • हाताला मुंग्या येणे किंवा बधीरपणा

  • पाठदुखी वाढणं

काही प्रकरणांमध्ये या समस्या वाढल्यास मणक्यावर अतिरिक्त ताण येऊन स्लिप डिस्कसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

प्रतिबंध कसा कराल?

तज्ञांच्या मते, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास ‘टेक्स्ट नेक’पासून बचाव करता येऊ शकतो.

  • योग्य शारीरीक स्थिती राखा-मोबाईल वापरताना तो डोळ्यांच्या समोर धरा. मान खाली झुकवू नका.

  • ब्रेक घ्या- दर ३० मिनिटांनी ३० सेकंदांचा ब्रेक घ्या. उभे राहा आणि तुमचे खांदे १० वेळा मागे फिरवा, मानेची स्ट्रेचिंग करा.

  • एर्गोनॉमिक सेटअप- लॅपटॉप वापरताना स्क्रीन डोळ्यांच्या उंचीवर ठेवा आणि तुमची खुर्ची देखील योग्य उंचीची असेल याची खात्री करा.

  • व्यायाम करा- मानेसाठी हलके स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग व्यायाम करा.

  • स्क्रीन टाइम कमी करा - मोबाईल, लमपटॅापचा अनावश्यक वापर टाळा, विशेषतः झोपण्यापूर्वी गॅजेट्सचा वापर करणे टाळा.

वेळीच काळजी घेणं गरजेचं

‘टेक्स्ट नेक’ ही सुरुवातीला एक सामान्य समस्या वाटली तरी दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती एक गंभीर समस्या ठरु शकते. लक्षणं दिसताच योग्य उपाययोजना करणं आणि गरज असल्यास तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः तरुण आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.

बदलत्या काळानुसार डिजिटल उपकरणांचा वापर पूर्णपणे टाळता येणं शक्य नाही, पण योग्य सवयी अंगीकारणं गरजेचं असून त्यामुळे ‘टेक्स्ट नेक’ सारख्या समस्यांपासून नक्कीच दूर राहता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

Sattu Drink Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 'सत्तू ड्रिंक', कसं बनवायचं? आणि फायदे काय? जाणून घ्या

How Painkillers Work: पेनकिलर घेतल्यानंतर लगेच कशा गायब होतात वेदना? वाचा औषधं पोटात गेल्यावर कसं काम करतं?

जालन्यातील माजी आमदाराचे निधन, अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हळहळ

मोठी बातमी! LPG सिलेंडरच्या नियमात मोठे बदल! सामान्यांना दिलासा?

SCROLL FOR NEXT