सध्याच्या काळात अनेकांमध्ये प्रकर्षाने जाणवणारी समस्या म्हणजे स्ट्रेस stress. ताण हा कोणत्याही गोष्टीचा येऊ शकतो. त्यामुळे आजकाल लहान मुलांमध्येदेखील ही समस्या पाहायला मिळते. परंतु, जीवन जगताना जशा चांगल्या गोष्टी घडत असतात. तशाच काही नकारात्मक Negative गोष्टीही घडत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या मानसिकेतवर tension आणि परिणामी शरीरावर होत असतो. परंतु, हा स्ट्रेस किंवा ताण नेमका येतो कसा? ते जाणून घेऊयात. What is stress and What causes tension
प्रत्येक व्यक्तीच्या वयाप्रमाणे त्याच्या स्ट्रेसचं स्वरुप बदलत असतं. पण कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे अपूर्णता, अशांतता, अस्थिरता आणि अप्रसन्नता आहेच. आपण सगळेच आपापल्या परीने आणि पद्धतीने या स्ट्रेसला झुंज देत मार्ग काढत असतो आणि उरलेल्या, निचरा न झालेल्या तणावासोबत जगायला शिकतो. खरंतर निसर्गाला हे अभिप्रेत नाही.
हे देखील पहा -
आजचा ताण उद्या कॅरी फॉरवर्ड होऊ नये यासाठी निसर्गाने रात्र तयार केली. म्हणजे निसर्गाने स्ट्रेस कमी करण्याची सोय केलेली आहे, ती म्हणजे झोपेच्या रूपात! पण अनेकांच्या झोपेच्या वेळापत्रकातच बिघाड झाल्यामुळे तणावावर इलाज तर होत नाहीच. याउलट अपूर्ण आणि तुटक झोपेच्या दुष्परिणामांची त्यात भर पडते आणि हे दुष्टचक्र चालू राहते.
स्ट्रेस म्हणजे नेमकं काय? त्याचा शरीरावर कसा होतो परिणाम
स्ट्रेस हा मनाच्या पातळीवर सुरू होतो. पण हळूहळू त्याचे आंतरिक अवयवांवर परिणाम दिसू लागतात. ही आंतरिंद्रिये त्यांच्यापरीने लढत असतात. परंतु, जेव्हा त्यांची शक्ती कमी होत जाते. तसतसा शरीरात रोगांचा शिरकाव व्हायला लागतो.
उदाहरणार्थ स्वादुपिंडाची (pancreas) कार्यक्षमता कमी होऊ लागली की मधुमेह (diabetes) होतो, गर्भाशयाची (uterus) क्षमता कमी झाली की फायब्रॉइड्स होतात, अंडाशयामध्ये (ovary) पीसीओडी, थायरॉईड, बद्धकोष्ठता (constipation), हृदयविकार, लठ्ठपणा (obesity), यकृताचे (liver) आजार इत्यादी. यांच्यावर उपाय म्हणून आपण लगेच औषधांकडे धाव घेतो. परंतु, औषधांकडे धाव घेण्यापूर्वी आपल्या जीवनशैलीतच थोडा बदल केला तर या समस्येवर नक्कीच मात करता येईल.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.