QR Code Scam Saam Tv
लाईफस्टाईल

QR Code Scam : सावधान! क्यूआर कोड स्कॅन करताय? बँक खातं होईल रिकामं, या गोष्टींची काळजी घ्या

Online Scam : ऑनलाइन व्यवहाराचा वाढता कल पाहता ऑनलाइन फसवणुकीच्या घटना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Online Fraud :

ऑनलाइन शॉपिंगपासून ते किरकोळ खरेदीसाठी सहज वापरला जातो तो क्यूआर कोड. दुकानात गेल्यानंतर किंवा खरेदी करताना आपण पैसे भरण्यासाठी क्यू आर कोडचा वापर केला जातो.

हल्लीच्या डिजिटलायझेशनच्या युगात सगळ्यांना ऑनलाइन पेमेंट करणे सोपे वाटते. क्यू आर कोडमार्फत अनेकदा लाखोंचे नुकसान होणाऱ्या बातम्या देखील आपल्याला ऐकू आल्या आहेत. ऑनलाइन व्यवहाराचा वाढता कल पाहता ऑनलाइन फसवणुकीच्या घटना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सायबर (Cyber) सुरक्षा कंपन्यांच्या मते, स्कॅमर लोकांची फसवणूक करण्यासाठी फिशिंग लिंकची मदत घेऊन स्कॅम करत आहे. यामध्ये स्कॅमर ईमेल मार्फत क्यूआर कोड कोड पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत. हे क्यूआर कोड फिशिंग लिंक्स आणि स्कॅमसह एन्कोड केलेले आहेत. स्कॅन करताच वापरकर्त्यांचे बँक (Bank) खाते रिकामे होऊ शकते. यामध्ये असे दिसून आले की, लोकांना भेटवस्तू आणि परतावाच्या नावाखाली फसवत आहेत.

1. स्कॅम कसा होतो?

जेव्हा आपल्याला भेटवस्तूंसाठी क्यूआर कोड पाठवला जातो त्यावेळी पासवर्ड देखील टाकावा लागतो. तुम्ही पासवर्ड एंटर केल्यास तुम्ही स्कॅमचे शिकार होऊ शकतात. कारण यामधून तुम्हाला कोणतीही भेटवस्तू मिळणार नाही. उलट बँक खाते रिकामे होऊ शकते.

2. एफबीआयकडून अलर्ट

दुकानदाराच्या ठिकाणी अनेक क्यूआर कोड लावलेले असतात. यामध्ये स्कॅमर फेस कोड टाकत असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे तुमच्या खात्यातील पैसे दुसऱ्याच्या खात्यात सहज जातील. अशा स्कॅमर्सना एफबीआयकडून इशाराही देण्यात आला होता. अमेरिकन एजन्सी एफबीआयने म्हटले आहे की, काहीवेळा स्कॅमर (Scam) लोक बनावट क्यूआर कोड बनवत आहेत.

एफबीआयनुसार हे कोड स्कॅन केल्यानंतर मोबाइल हॅक होऊ शकतो. मोबाइल डेटा हॅकर्सकडे जाऊन तुमच्या मोबाइलचा वैयक्तिक डेटासह बँक खाते हॅक होऊ शकते.

3. क्यूआर कोड स्कॅन करताना काय काळजी घ्याल?

  • सध्याच्या डिजिटलायझेशनच्या युगात सावध आणि सतर्क राहूनच ऑनलाइन पेमेंट करा. यासाठी तुम्हाला ईमेल मार्फत आलेला क्यूआर कोड स्कॅम म्हणून समजावा.

  • स्कॅमर्स अनेकदा QR कोड पाठवून पासवर्ड आणि सर्व्हिस एक्सपायरी असे ईमेल पाठवतात. त्यामुळे आपल्याकडून चुका होतात.

  • ईमेलवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खात्री करुन घ्या. त्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्यापासून तुम्ही वाचू शकता.

  • दुकानात किंवा कोणत्याही ठिकाणी स्कॅन करताना QR कोड घाईत स्कॅन करु नका. स्कॅन करताना तो क्यूआर कोड कोणच्या नावावर आहे ते पाहा. दुकानदाराच्या नावावर असेल तरच पेमेंट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

SCROLL FOR NEXT