Kidney Transplant : नुकतेच RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे सिंगापूरमधील माउंट एलिझाबेथ रुग्णालयात सोमवारी किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्यांची मुलगी रोहिणी हिने लालू यादव यांना किडनी दान केली.
शरीराच्या महत्त्वाच्या अंगापैकी एक किडनी आहे. दोन किडनीपैकी एक किडनी दान केल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की, यानंतरच जीवन कसे असेल. एखादी व्यक्ती एका मूत्रपिंडाने किती काळ जगू शकते? प्रत्यारोपणानंतर कोणत्या प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे. चला याबद्दल जाणून घेऊया
1. किडनी प्रत्यारोपण म्हणजे काय?
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दोन किडनी (Kidney) असतात. एका किडनीच्या मदतीने माणूस जगू शकतो, पण जेव्हा दोन्ही किडनी काम करणे थांबवतात तेव्हा व्यक्तीला किडनी प्रत्यारोपणाची गरज असते. यामध्ये जुनी किडनी काढून दुसरी किडनी लावली जाते.
2. मूत्रपिंड प्रत्यारोपण कधी आवश्यक आहे?
किडनी फेल्युअरच्या शेवटच्या टप्प्यात या आजारामुळे रक्तामध्ये अनेक प्रकारचे विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ तयार होऊ लागतात, त्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येतो. त्यानंतर रुग्णाला किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांच्या मते शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठी डायलिसिसपेक्षा किडनी प्रत्यारोपण हा उत्तम उपाय आहे.
3. प्रत्यारोपणाची प्रक्रिया काय आहे?
किडनी देणारी व्यक्ती जिवंत असेल तर प्रत्यारोपणाची तयारी दात्याच्या म्हणण्यानुसार आधीच केली जाते. मृत व्यक्तीकडून किडनी घ्यायची असल्यास प्रत्यारोपण केंद्र किडनी मिळाल्यानंतर रुग्णाला संपूर्ण माहिती देते. त्यानंतर ही शस्त्रक्रिया होते. ज्यामध्ये सामान्यतः खराब किडनी काढली जात नाही, तर नवीन किडनी पोटाच्या खालच्या भागात लावली जाते. यानंतर, नवीन किडनी रुग्णाच्या रक्तवाहिनी आणि मूत्राशयाशी जोडली जाते.
4. किडनी प्रत्यारोपणानंतर बरे होण्यास किती वेळ लागतो?
किडनी प्रत्यारोपणानंतर शरीर बरे होण्यासाठी साधारणपणे सहा आठवडे लागतात. परंतु ही प्रक्रिया अधिक काळही असू शकते.
किडनी दान केल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी (Care) घ्यावी?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, किडनी दान केल्यानंतर दात्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, जसे की काही समस्या असल्यास लगेच डॉक्टरांना कळवा. किडनी दान केल्यानंतर ब्लड प्रेशर, लघवी तपासणी, ब्लड युरिया टेस्ट आणि संपूर्ण शरीर तपासणी वर्षातून एकदा करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.