A person lying awake in a hotel room due to the “First Night Effect,” where the brain remains partially alert in unfamiliar surroundings saam tv
लाईफस्टाईल

What Is First Night Effect: नवीन ठिकाणी रात्रीची झोप का येत नाही? ‘फर्स्ट-नाइट इफेक्ट’ बाबत जाणून घ्या

What Is First Night Effect: हा आपल्या सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग आहे. तो आपल्याला धोक्यापासून वाचवण्यास मदत करतो. जसजसे एखादे ठिकाण परिचित होते तसतसे ही सतर्कता कमी होत असते.

Bharat Jadhav

  • ‘फर्स्ट नाईट इफेक्ट’ हा मेंदूचा नैसर्गिक सुरक्षा प्रतिसाद आहे.

  • नवीन ठिकाणी झोपताना मेंदू अंशतः जागा राहतो.

  • त्यामुळे झोप हलकी लागते आणि छोट्याशा आवाजानेही जाग येऊ शकते.

अनेकांना आपल्या घराशिवाय दुसऱ्या नव्या ठिकाणी झोप येत नाही, असा अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींना आला असेल. नवीन ठिकाणी झोप लागणे कठीण असतं? पण ही समस्या असणारे तुम्ही एकटे नाही आहात. बहुतेक लोकांना ही समस्या येत असते. नव्या ठिकाणी रात्रीची झोप न येणं हा "फर्स्ट नाईट इफेक्ट" असतो.

शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा आपण नवीन ठिकाणी झोपतो तेव्हा आपला मेंदू पूर्णपणे शांत झालेला नसतो. याला "फर्स्ट नाइट इफेक्ट" म्हणतात. यामुळे तुमचे शरीर आणि मेंदू दोन्ही सतर्क असतात, यामुळे थोडासा आवाज देखील लक्ष विचलित होत असते.

मेंदूला सुरक्षिततेची आवश्यकता असते

झोप ही आपल्यासाठी एक असुरक्षित अवस्था आहे. आपण स्वतःचे रक्षण करण्याच्या स्थितीत नसतो. म्हणूनच जोपर्यंत आपण सुरक्षित असल्याचं वाटत नाही तोपर्यंत आपला मेंदू सतर्क राहत असतो. तुम्हाला विश्वास असलेल्या किंवा ओळखीच्या ठिकाणी सहज झोप येते. परंतु इतर ठिकाणी झोप येत नाही किंवा तुम्ही झोपण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला परत परत जाग येत असते.

शरीरात काय घडत असतं?

जेव्हा तुम्ही आरामदायी स्थितीत असता तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान थोडे कमी होते. झोपेला प्रोत्साहन देणारे मेलाटोनिन हार्मोन वाढत असते. सतर्कता कमी होते. परंतु नवीन ठिकाणी, झोप लागणे कठीण होते, कारण या आवश्यक घटकांचा अभाव असतो.

बाह्य वातावरण महत्वाचे का आहे?

घरी झोपण्यापूर्वी लाईट बंद करणे, फोन बाजूला ठेवणे आणि नेहमीच्या बेडवर झोपणे अशी तुमची एक निश्चित दिनचर्या असते. हे सर्व तुमच्या मेंदूला झोपण्याची वेळ झाली आहे आणि तुम्ही सुरक्षित आहात असे सिग्नल देतात. परंतु नवीन ठिकाणी वेगळी परिस्थिती असू शकते. बाजुला येणारे आवाज नवीन असतात. गादी किंवा उशी वेगळी असू शकते. या सर्व गोष्टीमुळे तुमचे मन गोंधळात पडत असते.

काही लोकांना दुसऱ्या ठिकाणी चांगली झोप येते

विशेष म्हणजे, काही लोकांनी दुसऱ्या ठिकाणी चांगली झोप येत असते. हे का होते असा प्रश्न अनेकांना पडला असेल. हे घरातील कामे आणि जबाबदाऱ्या नसणे, अपूर्ण कामे पूर्ण करण्याची चिंता नसणे. काम आणि विश्रांती यांच्यातील स्पष्ट सीमारेषा असल्यानं अनेकांना दुसऱ्या ठिकाणी झोप येत असते. जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी चांगली झोप येत असेल तर ते तुमच्या घरातील वातावरण खूप व्यस्त आहे हे लक्षात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colombia Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT