Hiatus Hernias Meaning in Marathi
Hiatus Hernias Meaning in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Hiatus Hernias Meaning: हायटस हर्निया म्हणजे काय? याची लक्षणे कोणती? उपचार कसा कराल? जाणून घेऊया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hiatus Hernias Symptoms:

हायटस हर्निया ही एक अशी स्थिती ज्यात पोटाचा काही भाग अन्ननलिकेच्या समोरील बाजूला छातीतमध्ये ढकलला जातो तेव्हा या प्रकारचा हर्निया होऊ शकतो. यामध्ये पोटाचा भाग हा छातीच्या पिंजऱ्यातून डायाफ्रामच्या माध्यमातून निघतो.

मुंबई, सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्स,सल्लागार बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन, मेटाहेल- लॅप्रोस्कोपी आणि बॅरियाट्रिक सर्जरी सेंटरच्या - डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणतात

डायाफ्राम म्हणजे मासंपेशींचे एक आवरण आहे जे तुमच्या फुफ्फुसांना हवा आत घेण्यास मदत करते. या हर्नियाच्या प्रकारात तुमच्या पोटाचा भाग हे छातीपासून वेगळं करतंसामान्यतः प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात दिसून येतो. या प्रकारच्या हर्नियामुळे छातीत जळजळ होते आणि उलट्या होतात. ही स्थिती जन्मापासून असू शकते आणि वजन उचलणे, बद्धकोष्ठतेची समस्या, जुनाट खोकला, किंवा वयोवृध्द आणि लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्ये देखील उद्भवू शकते.

1. हायटस हर्नियाचे प्रकार: हायटस हर्नियाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत

  • सरकणारा हायटस हर्निया: हा हायटस हर्नियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. या प्रकारात, अन्न-नलिका आणि पोटाला जोडणारा भाग आणि कधीकधी पोटाचा वरचा भाग हायटल ओपनिंगद्वारे छातीवर सरकतो. या हालचालीमुळे अॅसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ आणि पोटातील अन्न पुन्हा अन्न-नलिकेमध्ये परतणे यासारखी लक्षणे (Symptoms) दिसू शकतात.

  • पॅरा - ओसोफेजल हर्निया: हा क्वचितच आढळून येणारा प्रकार आहे जेथे पोट आणि अन्ननलिका त्यांच्या नैसर्गिक स्थितीत राहतात, परंतु पोटाचा एक भाग हायटल ओपनिंगद्वारे बाहेर येऊ शकतो. या प्रकारच्या हर्नियामुळे पोटाच्या ऊतींवर दाब येणे आणि रक्तपुरवठ्यामध्ये बिघाड येणे यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात. हे खूप वेदनादायक (pain) असू शकते आणि यामुळे उलट्या देखील होऊ शकतात.

2. लक्षणे: 

हायटस हर्नियाची लक्षणे भिन्न असू शकतात, काही व्यक्तींना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत तर काहींना तीव्र ऍसिड रिफ्लक्सची समस्या भासू शकते. सामान्य चिन्हे आणि लक्षणांमध्ये छातीत जळजळ, आम्लता, गिळण्यात अडचणी, उलट्या आणि अॅसिड रिफ्लक्स यांचा समावेश होतो. 

झोपताना किंवा वाकताना ही लक्षणे आणखी वाढू शकतात आणि सरळ स्थितीत असताना पुर्ववत होऊ शकतात. काही व्यक्तींना श्वासोच्छवास आणि दम्यासारखी लक्षणे देखील जाणवू शकतात, तर काहींना आवाजात बदल जाणवू शकतो, उलट्या किंवा मलावाटे रक्त येऊ शकते.

3. निदान:

हायटस हर्नियाचे निदान करताना त्याचा वैद्यकिय इतिहास आणि क्लिनिकल तपासणीसह सर्वसमावेशक मूल्यांकनाचा समावेश होतो. याकरिता विविध चाचण्या केल्या जाऊ शकतात.

• बेरियम स्वॉलो किंवा एसोफॅगोग्राम -बॅरियम एक्स-रेमध्ये पचनतंत्राचा एक्स-रे काढला जातो. • अप्पर जीआय एंडोस्कोपी - एंडोस्कोपीमध्ये तुमच्या गळ्याच्या खालील आणि पोटामध्ये एक छोटा कॅमेरा लावला जातो. यामुळे डॉक्टरांना तुमच्या पोटातील अंतर्गत भाग तपासता येतो.

• 24-तासांकरिता पीएच(PH) मॅनोमेट्री •रुग्णांना एकदाच भरपेट न जेवता थोड्या थोड्या अंतराने खाण्याचा सल्ला, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळण्याचा, रात्रीचे जेवण लवकर करण्याचा आणि डोके उंचावर ठेवून करून झोपण्याचा सल्ला दिला जातो. • अँटासिड औषधे काही रुग्णांना काहीसा आराम देऊ शकतात. • जे औषधांना प्रतिसाद देत नाहीत, बॅरेटच्या अन्ननलिका, दम्यासारखी लक्षणे किंवा अल्सर यांसारख्या गुंतागुंतीचा सामना करतात त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.

हायटस हर्नियासाठी शस्त्रक्रिया: हायटस हर्नियासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय विशेषत: ज्यांची लक्षणे तीव्र किंवा गुंतागुंतीची आहेत त्यांच्यासाठी असतो. त्यासाठी वैद्यकिय सल्ला घेणे योग्य राहिल.

लॅपरोस्कोपिक निसेन फंडोप्लिकेशन: एका छोट्या कॅमेराचा वापर करून आणि सर्जरीची छोटी उपकरणं वापर करण्यासाठी काही छोट्या चिरा देऊन हर्नियाची सर्जरी केली जाते. लेप्रोस्कोपिक सर्जरी केल्यामुळे हर्नियाच्या आसपासच्या उतींना कमी हानी पोचते

लॅपरोस्कोपिक टूपेट फंडोप्लिकेशन: निसेन फंडोप्लिकेशन प्रमाणेच, टूपेट फंडोप्लिकेशन देखील लॅपरोस्कोपिक पद्धतीने केले जाते.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की शस्त्रक्रिया पद्धतीची निवड विविध घटकांवर अवलंबून असते, ज्यामध्ये हर्नियाचा आकार आणि प्रकार, लक्षणांची तीव्रता, रुग्णाचे एकूण आरोग्य यांचा समावेश होतो. हायटस हर्नियासाठी शस्त्रक्रिया करणाऱ्या रूग्णांनी योग्य शस्त्रक्रिया पर्यायाबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. हायटस हर्निया असलेल्या व्यक्तींसाठी वैद्यकिय सल्ला घेणे आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय समजून घेऊन एखादी व्यक्ती ही स्थिती प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकते आणि त्यांचे भविष्य सुधारू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shambhuraj Desai News | मविआ फुटणार! ठाकरे आणि पवारांच्या पक्षाला पुन्हा गळती लागणार? देसाईंचा मोठा गौप्यस्फोट

Nashik Onion News | कपडा हटवला, नियम मोडला, घोषणा दिल्या! नाशकात काय घडलं?

Eknath Shinde News | राऊतांच्या 'त्या' आरोपांमुळे पोलिसांनी थेट मुख्यमंत्र्याची बॅंगा तापसल्या!

Today's Marathi News Live : मराठा क्रांती मोर्चाचा मविआच्या उमेदवाराला पाठिंबा

Mhada Pune: आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT