How 21 Days Without Wheat Changes Your Body Saam Tv News
लाईफस्टाईल

२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

How 21 Days Without Wheat Changes Your Body: गव्हाची चपाती हा भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे. २१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर, शरीरात कोणते बदल दिसतील? जाणून घ्या.

Bhagyashree Kamble

  • २१ दिवस चपाती न खाण्याचे फायदे.

  • गव्हातील ग्लूटेन पचनक्रिया मंदावते.

  • गॅसेसचाही त्रास होतो.

  • चपाती सोडल्यानंतर शरीरात कोणते बदल दिसतात?

भारतीयांच्या आहारात चपाती असतेच. चपाती- भाजी, वरण - भात, असं परिपूर्ण जेवण आपण जेवतो. काही जण एक वेळ चपाती किंवा एक वेळ भाकरी खातात. तर, काहींनी चपाती प्रचंड आवडते. त्यामुळे अशी लोक दोन्ही वेळ चपाती खातात. पण चपाती खाल्ल्यानं वजन वाढते, असं म्हणतात, हे कितपत खरं आहे? चपाती सोडल्यानं शरीरात किती बदल घडतात? २१ दिवस चपाती न खाण्याचे फायदे किती? पाहूयात.

गव्हाची चपाती भारतातील बहुतांश घरी खाल्ली जाते. पण गहूमध्ये अधिक ग्लूटेन असेत. ग्लूटेनमुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे काहींना लवकर चपाती पचत नाही. यासंदर्भात कर्कतज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी २१ दिवस गहू सोडल्यानं शरीरात कोणते बदल होतात, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

व्हिडिओमध्ये डॉ. तरंग म्हणाले, 'मी नेहमीच म्हणतो, गहूमध्ये ग्लूटेन असते. पूर्वी लोकांच्या आहारात हमखास चपाती असत. चपाती खाऊन लोक ऐंशी किंवा नव्वद वर्षे जगली आहेत. पूर्वी गहू सालसह दळले जात होते. आताच्या गहूमध्ये फरक आहे', असं डॉक्टर म्हणाले.

'गहूमध्ये ग्लूटेन असते. ग्लूटेन सोडल्यानंतर पोटफूगी, गॅसेसचा त्रास कमी होतो. ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे, त्यांनी आहारातून ग्लूटेन सोडून द्यावं', असं डॉक्टर म्हणाले. 'आहारातून गव्हापासून तयार चपाती वगळावी किंवा कमी प्रमाणात खावी. ज्यांना पचनक्रियेचा त्रास आहे, त्यांनी चपाती कमी प्रमाणात खावी', असंही डॉक्टर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT