Health Damage from Anger SAAM TV
लाईफस्टाईल

Health Damage from Anger: फक्त २ मिनिटांच्या रागाने तुमच्या शरीरात पाहा काय बदल होतो? परिणाम जाणून डोकं चक्रावेल

Effect of anger on body : ‘जर्नल ऑफ बिहेवियरल मेडिसिन’ या नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. अभ्यासानुसार, अवघ्या एका मिनिटासाठी आलेला राग तुमच्या इम्युनिटीवर तब्बल पाच तासांपर्यंत नकारात्मक परिणाम करू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्यापैकी अनेक जणांना भरपूर राग येतो. राग एखाद्या व्यक्तीच्या नाकावर असतो, असं म्हणताना तु्म्ही ऐकलं असेल. जास्त राग किंवा संतापणं योग्य नाही. मात्र तुम्हाला माहितीये का तुमचं हे रागावणं आणि चिडचिड तुम्हाला आजारी पाडतंय. राग ही एक अशी भावना आहे जी एखाद्या व्यक्तीवर मानसिक आणि शारीरिक परिणाम करू शकते. फक्त २ मिनिटांचा राग तुमच्या शरीराला अनेक तासांपर्यंत हानी पोहोचवू शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

जर्नल ऑफ बिहेवियरल मेडिसिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, केवळ एका मिनिटाचा राग तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला ५ तासांपर्यंत कमकुवत करू शकतो. या अभ्यासातून नेमकं काय समोर आलंय ते पाहूयात.

२ मिनिटांचा राग तुमच्या शरीरात काय बदल करतो?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग येतो तेव्हा त्याच्या शरीरात 'कॉर्टिसॉल' नावाच्या हार्मोनची पातळी वेगाने वाढते. फक्त २ मिनिटं रागवल्याने तुमच्या शरीरात पुढील ७ तास कॉर्टिसोलची पातळी वाढून राहते. याचाच अर्थ राग हा केवळ तुमच्या तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत नाही तर तुमचे शारीरिक आरोग्य देखील कमकुवत करतं.

कार्टिसोल हार्मोन म्हणजे नेमकं काय?

कॉर्टिसॉल हा एक स्ट्रेस हार्मोन असून जो शरीरातील विविध गोष्टींवर परिणाम करतो. यामध्ये चयापचय, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित करणं या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. जेव्हा कोर्टिसोलची पातळी वाढते तेव्हा तुमचे शरीर तणावाच्या स्थितीत जातं. परिणामी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटू शकते.

रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम

राग आल्यानंतर तुमची रोगप्रतिकारक शक्ती ७ तासांसाठी कमकुवत होते. याचा अर्थ असा की, तुमचे शरीर संसर्ग आणि आजारांशी लढण्यात कमकुवत होतं. यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला आणि इतर आजारांचा अगदी सहजरित्या त्रास होण्याची शक्यता असते.

झोपेवरही होतो परिणाम

रागाचा तुमच्या झोपेवरही परिणाम होत असतो. फक्त २ मिनिटांचा राग पुढील २४ तासांसाठी तुमच्या झोपेचं चक्र बिघडवू शकतं. याचाच अर्थ या कालावधीमध्ये तुम्हाला शांत झोप मिळू शकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT