लाँग डिस्टंन्स रिलेशन तुम्हाच्या पुर्ण आयुष्यात अनेक प्रकारे हाणी पोहोचू शकते. मग ते तुमचे मानसिक आरोग्य असो वा शारीरिक. पण याचा तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम होऊ शकतो का? हेच आपण जाणून घेवूयात.
सध्या व्हॅलेंटाईन वीक 2022 सुरु आहे. आणि देशात ओमिक्रॉनचा कहर अजून संपलेला नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत Long Distance Relationship मध्ये असाल किंवा कोरोना काळात तुमच्या नात्यात काही अंतर आले असेल, तर तुम्ही नक्कीच भेटण्याचा विचार करत असाल.
अशा परिस्थितीत एकमेकांच्या जवळ येणे अत्यावश्यक आहे. पण तुम्ही विचार केला आहे का की दीर्घकाळानंतर जवळीक साधल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? नसेल तर आत्ताच विचार करा कारण तज्ञ किंवा लोकांचा असा विश्वास आहे की दीर्घ गॅपनंतर शारीरिक संबंध साधायला आपली बॉडी तयार नसते. सेक्स लाईफ मधील अंतर तुम्हाला भावनात्मक दृष्ट्या दूर लोटू शकते. याने तुमच्या शरिरातही मोठे बदल दिसून येतात.
तुमचा रक्तदाब वाढू शकतो
बायोलॉजिकल सायकॉलॉजी या वैद्यकीय जर्नलमध्ये 2006 मध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की जे लोक नियमित लैंगिक संबंध ठेवतात त्यांचा रक्तदाब लैंगिकदृष्ट्या जे संबंध ठेवत नाहीत त्यांचा रक्तदाब यात फरक जाणवतो. शारीरिक संबंध ठेवल्याने नक्कीच आपल्याला फायदे होऊ शकतात. पण दिर्घकाळानंतर सेक्स केल्याने तुमचा रक्तादाब वाढू शकतो.
तणाव वाढल्याने दुरावा येतो
साहजिकच यामागे शास्त्रीय कारण आहे. संभोगा दरम्यान एंडोर्फिन सोडले जातात, जे तुमचा मूड सुधारण्यास मदत करू शकतात. परंतु जर तुम्ही कोणत्याही तणावात येऊन शारीरिक संबंध ठेवले तर ते नक्कीच तुमच्या शरिरासाठी हाणीकारक ठरु शकते.
दूर राहिल्याने लैंगिक आयुष्यात परिणाम होतात
सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. तुमच्या जोडीदारासोबत त्या खास क्षणांकडे परत जा ज्याने तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले होईल. पण याची काळजी जरुर घ्या की दिर्घ काळानंतर तुम्ही संबंध ठेवणार आहात.
दीर्घ काळानंतर सेक्स करणे अनेकांना रोमांचक वाटू शकते, परंतु तुमच्या शरीराला न सेक्स करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे या नवीन बदलाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला थोडा वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो हे जाणून घ्या.
योनी कोरडेपणा
अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिननुसार, जर तुम्ही जास्त वेळ सेक्स करणे तसेच हस्तमैथुन टाळले असेल तर योनीमार्गात कोरडेपणा सारखी समस्या उद्भवू शकते. यामुळे लैंगिक संबंध पुन्हा अस्वस्थ होऊ शकतात, कारण त्यामुळे तुम्हाला वेदनाही होऊ शकतात.
संभोग
जर तुम्ही खूप दिवसांनी सेक्स करत असाल तर तुम्हाला कामोत्तेजित व्हायला वेळ लागू शकतो. अशा स्थितीत तुम्ही फोरप्लेचा अवलंब करू शकता आणि तुमचा पार्टनर तुम्हाला ऑर्गेज्मपर्यंत पोहोचण्यात मदत करू शकतो. काळजी करू नका कारण हळूहळू तुमच्या शरीराला त्याची सवय होईल.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.