

Medical Tests Before Marriage: सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. भारतातील लग्नाबद्दल सांगायचं म्हणलं की, येथे मोठ्ठया रीतिरिवाज आणि धुमधडाक्यात लग्न केले जातात. काही ठिकाणी लग्नाआधी मुलामुलींची पत्रिका बघितली जाते. पत्रिका जुळल्यावर स्थळ पाहिलं जात. लग्नाच्या आधी मुलगा आणि मुलीमध्ये अनके गोष्टी तपासल्या जातात जसे की, वागणूक, चालणे, बोलणे, एकमेकांबद्दलचा समजूतदारपणा, अनुरूपता अश्या अनके गोष्टी पाहिल्या जातात. परंतु या सर्वात एक अशी गोष्ट आहे ज्याकडे कोणीच एवढं लक्ष देऊन नाही पाहत आणि ती गोष्ट आहे मेडिकल फिटनेस. होय! लग्नाचा आधी मेडिकल फिटनेस टेस्ट (Medical Tests Before Wedding) करून घेतल्याने जोडप्यामधील संबंध अधिक मजबूत होण्यासोबतच निरोगी देखील होते.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर खरोखरच जीवन जगण्याचे स्वप्न बघत असाल तर, समोरच्या व्यक्तीला तुमच्या मेडिकल स्टेटस बद्दल संपूर्ण आणि खरी माहिती माहित असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे लग्नानंतरचे जीवन निरोगी ठेवायचे असेल तर, सर्व लोकांनी लग्नापूर्वी आपल्या जोडीदाराच्या किंवा स्वतःच्या या 4 वैद्यकीय चाचण्या करून घेणे फार गरजेचे आहे. कारण सुरु होणाऱ्या नवीन आयुष्यात तुम्हाला कोणत्याच आजारांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. जाणून घेऊयात काय आहेत या टेस्ट-
इनफर्टिलिटी टेस्ट-
पुरुषांमध्ये स्पर्मचा काउंट (Sperm Count) आणि महिलांमध्ये ओव्हरीच्या (Ovary) हेल्थ बद्दल जाणून घेण्यासाठी इनफर्टिलिटी टेस्ट (Infertility Test) करून घेणे फार गरजेचे असते कारण शरीरात इनफर्टिलिटी बद्दल असलेले कोणतेही लक्षणे आधीच दिसून येत नाहीत. याबद्दल टेस्ट करूनच माहिती मिळवली जाऊ शकते. तुम्हाला भविष्यात जेव्हा बेबी प्लांनिंग करायची असेल तेव्हा आणि तुमच्या दैनंदिन लैंगिक जीवनासाठी हे महत्वाचे असते. (Sexual Health After Marriage)
हे देखील पहा-
ब्लड ग्रुप कंपॅटिबिलिटी टेस्ट-
ही टेस्ट खूप गरजेची नसते परंतु तुम्ही जर भविष्यात बेबी प्लॅनींग करणार असाल तर तुम्हाला ही टेस्ट करणे फायदेशीर ठरेल. हे गरजेचे आहे की तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा Rh फॅक्टर समान असावा. जर तुमच्या दोघांचे रक्तगट जुळत नसेल तर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान त्रास सहन करावा लागू शकतो. (Blood group compatibility test)
अनुवंशिक रोगांशी संबंधित टेस्ट -
जोडप्यांनी लग्नापूर्वी अनुवांशिक चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. अनुवांशिक रोग सहजपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. अशा परिस्थितीत लग्नापूर्वी जनुकीय चाचणी करून घेणे आवश्यक आहे. अनुवांशिक आजारांमध्ये स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, किडनीचे आजार आणि मधुमेह यांचा समावेश होतो. हे आजार लवकर आढळून आल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतात जेणेकरून पुढे कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
सेक्शुअली ट्रांसमिटेड डिसिझेस टेस्ट-
आजच्या काळात लग्नापूर्वी सेक्स करणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत, लैंगिक संक्रमित रोग रोखण्यासाठी तुमची चाचणी होणे महत्वाचे आहे. या आजारांमध्ये एचआयव्ही, एड्स, गोनोरिया, हर्प्स, हेपेटायटीस सी यांचा समावेश होतो. हे काही आजार आहेत जे असुरक्षित संभोग (Unprotected Sex) केल्यामुळे पसरतात. यापैकी बहुतेक रोग प्राणघातक ठरू शकतात. या प्रकरणात, एसटीडी टेस्ट करा. ही चाचणी करून तुमच्या जोडीदाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तुम्ही भविष्यात मोठ्या अडचणी टाळू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.