Heart attack symptoms saam tv
लाईफस्टाईल

Heart attack symptoms: हार्ट अटॅक आला की शरीरात नेमकं काय घडतं? डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून वेळीच धोका ओळखा

हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज होऊन रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो. छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, घाम, धडधड किंवा अचानक बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम माधव नेने हे प्रसिद्ध सर्जन आहेत. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली होती. या पॉडकास्टमध्ये डॉ. नेने यांना हार्ट अटॅकबाबत काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. हार्ट अटॅक आला की शरीरात नेमकं काय होतं, त्याची लक्षणं कोणती असतात आणि अशावेळी व्यक्ती बेशुद्ध का पडते, याबाबत डॉ. नेने यांनी सोप्या भाषेत माहिती दिली.

हार्ट अटॅक आला की काय होतं?

डॉ. नेने यांनी सांगितलं की, हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होऊ शकतात. काही वेळा तीन धमन्यांमध्येही ब्लॉकेजची समस्या असू शकते. त्यामुळे हृदयाच्या एखाद्या भागात रक्ताचा प्रवाह नीट होत नाही. त्या भागाला रक्त आणि ऑक्सिजन मिळत नसल्याने तो भाग व्यवस्थित काम करणे बंद करू शकतो.

हार्ट अटॅकची लक्षणं कोणती?

हार्ट अटॅकच्या वेळी सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणं. हे दुखणं कधी कधी खांद्यापर्यंतही पसरू शकतं. यासोबतच श्वास घेण्यास त्रास होणं, नाकावर घाम येणं आणि हृदयाची धडधड वाढणं अशी लक्षणंही दिसू शकतात.

मात्र प्रत्येक व्यक्तीमध्ये ही लक्षणं दिसतीलच असे नाही. डॉ. नेने यांच्या मते, सुमारे २० टक्के रुग्णांमध्ये हार्ट अटॅकची कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. अशा व्यक्ती अचानक बेशुद्ध पडू शकतात. काही वेळा अशा परिस्थितीत कार्डियाक अरेस्टचा धोका निर्माण होऊ शकतो.

हार्ट अटॅकच्या वेळी व्यक्ती बेशुद्ध का पडते?

हार्ट अटॅकच्या वेळी काही व्यक्तींना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडण्याची धोका असतो. यामागचं एक कारण म्हणजे मेंदूपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह न पोहोचणं. मेंदूला रक्त मिळत नसेल तर व्यक्ती शुद्ध हरपून बेशुद्ध पडू शकते. अशावेळी हृदयाची धडधड खूप वाढू शकते. काही वेळा हृदयाची पंप करण्याची क्षमता इतकी कमी होते की, हृदय व्यवस्थित रक्त पंप करू शकत नाही. अशा परिस्थितीतही व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते.

त्यामुळे छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, अचानक घाम येणं, हृदयाची धडधड वाढणं किंवा अचानक बेशुद्ध होणं अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय मदत घेणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT