आपल्याला काही अडलं की आपण लगेच त्याचं उत्तर शोधण्यासाठी गुगलवर सर्च करतो. लहान मुलं, महिला तसंच पुरूष गुगलवर विविध गोष्टी शोधतात. प्रत्येकजण आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी गुगलची मदत घेतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात?
लोकं गुगलवर काय सर्च करतात याबाबत एक सर्व्हक्षण करण्यात आलं होतं. या संशोधनातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रश्नाच्या निकालाने लोकांना धक्का बसला आहे. चला जाणून घेऊया गुगलवर विवाहित महिला काय शोधतात.
गुगलच्या माहितीनुसार, विवाहित महिलांनी सर्वाधिक सर्च केलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या पतीला काय आवडतं. आपल्या पतीच्या आवडी-निवडी काय आहेत, त्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही, याची माहिती कशी घ्यायची याबाबत महिला गुगलवर सर्च करतात.
त्याचप्रमाणे गुगलवर हा प्रश्नही अनेकदा विचारला जातो की, आपल्या पतीचे मन कसं जिंकायचं? पतीला आनंदित कसं ठेवायचं याबाबत देखील विवाहित महिला गुगल सर्च करतात. अजून एक धक्कादायक खुलासा म्हणजे, विवाहित महिलांनी गुगलला आपल्या पतीला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं असंही सर्च केलं आहे. याशिवाय मूल होण्यासाठी योग्य वय कोणतं याबाबत देखील महिलांना सर्च केलं आहे.
आम्ही तुम्हाला सांगितलेल्या प्रश्नांशिवाय काही प्रश्न आहेत जे महिला लग्नानंतर गुगलला विचारतात. स्त्रियांना हे जाणून घ्यायचं असतं की, त्यांनी लग्नानंतर त्यांच्या नवीन कुटुंबात कसं रूळलं पाहिजे? नव्या कुटुंबाचा, सासरचा भाग कसा बनू शकतो. याशिवाय, तिला तिच्या कुटुंबाची जबाबदारी कशी पेलणार हे देखील नवविवाहित महिलांना जाणून घ्यायचं असतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.