मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हा एक असा आजार आहे जो तुमच्या नियमीत आणि योग्य जीवनशैली तसेच आहाराने नियंत्रित केला जाऊ शकतो. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक आयुर्वेदिक औषधे देखील वापरली जातात.
खरं तर बाजारात अनेक औषधे (Medicine) उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून वाढत्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. पण सतत औषधे घेतल्याने यकृत आणि किडनी खराब होते. येथे तुमच्यासाठी मधुमेहाच्या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी अशोकाच्या झाडाच्या सालीचे उपयोग आणि फायदे दिले आहेत ते पाहूयात. तुम्हाला तुमच्या घराजवळ अशोकाचे झाड सहज सापडेल.
अशोकाच्या सालीचा काढा
अशोकाच्या सालीमध्ये मधुमेहविरोधी असे गुणधर्म आढळतात. मधुमेहाच्या रुग्णांनी अशोकाची सालीचे पावडर आणि जांभळाची पावडर सम प्रमाणात मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन करावे. हे सेवन केल्याने शरीरातल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
याशिवाय 100 ml पाण्यात अशोकाच्या सालीच्या पावडरसोबत कडुलिंबाच्या सालीची पावडर (Powder) समप्रमाणात घेऊन मिसळून एक काढा बनवावा, आणि मंद आचेवर ठेवावा, उकड काढून काढा अर्धा होईपर्यंत वाट बघा आणि मग गॅस बंद करा. या काढ्याचे रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.
अशोकाच्या सालीचे फायदे काय आहेत?
अशोकाची साल संसर्ग टाळण्यासाठी फायदेशीर (Benefits)आहे. अशोकामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे संसर्ग पसरण्यापासून रोखतात.
पोटातील जंतांच्या समस्येवर अशोकाची साल फायदेशीर आहे. अशोकाच्या सालाचे पाणी प्यायल्याने पोटातील जंत दूर होतात.
अशोकाची साल अतिसार टाळण्यास मदत करते. तुरट गुणधर्मामुळे ते आतड्यांना निरोगी ठेवते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.