बऱ्याच पालकांना लहान मुलं खेळत असताना खाऊ भरवण्याची सवय असते. तज्ज्ञांच्या मते ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. असे केल्यास लहान मुलांना अनेक धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. लहान मुल धावत असताना त्यांना कोणताही खाऊ किंवा जेवण का भरवू नये? या बद्दल पुढे तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली आहे.
घरात लहान मुल असलं की साधारण ६ महिन्या नंतर त्याला वेगवेगळे पदार्थ चाखायला दिले जातात. पुढे बाळाचे जसजसे वय वाढत जाते तसे आपण आणखी पदार्थ, देतो. त्यात चॉकलेट, विविध गोळ्या, किंवा गोल आकाराचे विविध खाऊ. हे खाऊ त्यांना खेळताना दिल्यास काय गंभीर परिणाम होतो? यावर तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.
''लहान मुलांना खेळताना किंवा धावताना खाऊ देवू नये. अन्यथा जेली, पेपरमिंटच्या गोळ्या शेंगदाणे फुटाणे हे अन्ननलिकेतील श्वसननलिकेत जाऊन अडकते आणि त्यामुळे लहान मुलांना श्वास घेण्यापासून त्रास होऊ शकतो. त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. तो मृत्यू जेली मुळे नाही तर अन्न नलिकेत जाणारे खाद्य पदार्थ श्वास नलिकेत जाऊन अडकल्याने अश्या घटना घडतात. ज्यांना वेळेवर उपचार मिळाल्यास ते वाचतात किंवा उशीर झाल्यास त्यांचा मृत्यू झाल्याचा अनेक घटना घडल्या आहेत.
लहान मुलांच्या गळ्यात खाण्याचा पदार्थ अडकल्यास त्यात वाकून पाठीवर धाप दिल्यास ती वस्तू गळ्याबाहेर तोंडातून बाहेर पडू शकते. किंवा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यांच्यापर्यंत जाऊन उपचार गेल्यास जीव जाण्याचा धोका कमी होतो. आता डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याचा तो गोल्डन पिरेड असतो योग्य वेळी जर ते तिथे पोचू शकले नाही तर मृत्यू झाल्याच्याही अनेक घटना त्यामुळे लहान पोरांना काही खाऊ घालताना काळजी घेण्याचा सल्ला बालरोग तज्ञ डॉ. अविनाश बाणाईत यांनी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.