Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पिझ्झा खायला प्रचंड आवडतो.
आज आपण घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल टेस्टी नाश्ता कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत.
पिझ्झा बेस, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, स्वीट कॉर्न्स, पिझ्झा सॉस, मोजरेला चीज इ.
सगळ्या भाज्या बारीक चिरुन घ्या.
आता पिझ्झा बेसला सॉस लावा.
चिरलेल्या भाज्या आत्ता पिझ्झा बेसवर परवून घ्या. मग त्यावर मोजरेला चीज किसून टाका.
शेवटी त्यावर उकडलेले कणीस घाला.
आता गॅसवर पॅन ठेवा. त्यावर तुम्ही तेल किंवा बटर लावू शकता. ५-७ मिनिटे झाकून ठेवा.
आता बेस शिजलाय का तपासून गरमा गरम पिझ्झा सर्व्ह करा.