सकाळच्या वेळी अंथरुणातून उठताना अनेकांचे मन करत नाही. वारंवार अलार्म बंद करून अजून थोडा वेळ झोपावंसं वाटतं. ७ ते ८ तासांची पुरेशी झोप पूर्ण झाल्यानंतरही जर सतत डोके जड पडत असेल, अंगात ताकद वाटत नसेल किंवा दिवसभर आळस आणि सुस्ती जाणवत असेल, तर ही बाब सामान्य नाही. जाणून घ्या 'ही' महत्त्वाची कारणे
फक्त ८ तास अंथरुणावर पडून राहिल्याने शरीराला ताजेतवाने वाटेलच असे नाही. घरातील गोंगाट, अयोग्य किंवा अस्वस्थ, झोपण्याची अनियमित वेळ, झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनचा जास्त वापर आणि कॅफीनचे सेवन यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो.
रात्रीच्या वेळी घामावाटे किंवा लघवीवाटे शरीरातील पाणी कमी होऊ शकते. पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यास सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. लघवीचा रंग हलका पिवळा किंवा स्वच्छ असल्यास शरीर हायड्रेटेड होते.
आहारात संतुलित पोषणतज्त्वांचा अभाव असणे हे देखील थकव्याचे एक मुख्य कारण आहे. शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे न मिळाल्यास दिवसभर अंग मोडून येणे असा त्रास होऊ शकतो.
व्यायाम न करणे किंवा दिवसभर बसून राहण्याची जीवनशैलीचा थेट संबंध आपल्या झोपेवर होतो. शारीरिक सक्रियता नसल्यामुळे रात्री गाढ झोप लागत नाही आणि परिणामी सकाळी आळस राहतो. यासाठी दररोज किमान १५० मिनिटे व्यायाम, योग आणि ध्यान करावा.
मानसिक तणावामुळे झोप पूर्ण होत नाही किंवा झोपेचे चक्र बिघडते. तणाव कमी करण्यासाठी सकाळी चालणे, आवडते संगीत ऐकणे किंवा छंदांवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरते.
शरीरातील रक्ताची कमतरता झाल्यास अवयवांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही, ज्यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो.
थायरॉईड, मधुमेह, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा ऑटोइम्यून आजारांमुळेही झोपूनही थकवा जाणवू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, थकवा किंवा ऊर्जेची कमतरता ही अशी लक्षणे आहेत ज्यांकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. रात्री उशिरा जेवणे, आहारात पौष्टिकतेचा अभाव आणि अपुरी झोप या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. थकवा हा एक प्रकारचा इशारा आहे की, आपली जीवनशैली सुधारण्याची गरज आहे.
झोपण्याच्या आधी १ तास आणि उठल्यानंतर १ तास मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर टाळा.
तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासा.
समस्या गंभीर असल्यास थायरॉईड किंवा मधुमेहाची चाचणी करून घ्यावी.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.